mr_tw/bible/names/arabah.md

2.3 KiB

अराबात

तथ्य:

जुन्या करारामध्ये "अराबात" या शब्दाचा संदर्भ बर्याच मोठ्या वाळवंटी आणि मैदानी प्रदेशासाठी दिलेला आहे, जो यार्देन नदीच्या सभोवतालच्या खोऱ्यापासून आणि दक्षिणेस लाल समुद्राच्या उत्तर टोकापर्यंत पसरलेला आहे.

  • इस्राएलांनी मिसरहून कनान देशापर्यंत प्रवास करताना या वाळवंटातून प्रवास केला.
  • "अराबातचा समुद्र" ह्याचे "अरबात वाळवंटाच्या प्रदेशात स्थित समुद्र" असेही भाषांतर केले जाऊ शकते. या समुद्रास अनेकदा "क्षार समुद्र" किंवा "मृत समुद्र" म्हणून संबोधले जाते.
  • "अराबात" हा शब्द कोणत्याही वाळवंटाच्या प्रदेशाचा सामान्य संदर्भ असू शकतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: वाळवंट, लाव्हाळ्याचा समुद्र, यार्देन नदी, कनान, क्षार समुद्र, मिसर)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1026, H6160