mr_tw/bible/names/redsea.md

2.8 KiB

तांबडा समुद्र

तथ्य:

"तांबडा समुद्र" हे मिसर आणि अरब ह्यांच्यातील पाण्याचे नाव होते. ह्याला आता "तांबडा समुद्र" असे म्हणतात.

  • तांबडा समुद्र लांब आणि अरुंद आहे. हा सरोवर किंवा नदीपेक्षा मोठा आहे, पण तो एका महासागरापेक्षा खूप लहान आहे.
  • जेंव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघाले तेंव्हा त्यांना तांबडा समुद्र पार करावयाचे होते. देवाने तेथे चमत्कार केला आणि पाण्याला दोन भागामध्ये विभागले. जेणेकरून लोक कोरड्या भूमीवरून चालत पलीकडे जाऊ शकले.
  • कनानची भूमी या समुद्राच्या उत्तरेस होती.
  • ह्याचे भाषांतर "वेळूचा समुद्र" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अरब.कानान, मिसर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • जेव्हा इस्राएलांनी मिसरी सैन्य त्यांचा पाठलाग करतांना पाहिले तेव्हा त्यांना समजले की ते आता मिसरी सैन्य आणि तांबड्या समुद्राच्या मध्ये अडकले आहेत
  • मग देव मोशेस म्हणाला, "लोकांना तांबड्या समुद्राकडे जाण्यास सांग."
  • तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला.

Strong's

  • Strong's: H3220, H5488, G2063, G2281