mr_tw/bible/names/egypt.md

4.3 KiB

मिसर, मिसरी, मिसऱ्यांच्या

तथ्य:

मिसर कनान देशाच्या नैऋत्य दिशेला अफ्रिकेच्या ईशान्य भागातील एक देश आहे. मिसरी हा असा मनुष्य आहे, जो मिसर देशात राहतो.

  • प्राचीनकाळी, मिसर एक शक्तिशाली आणि समृद्ध देश होता
  • प्राचीन मिसर दोन भागांमध्ये विभागलेला होता, खालचा भाग (उत्तरी भाग, जिथे नाईल नदीचा प्रवाह खाली समुद्राकडे वाहत जातो) आणि वरचा भाग (दक्षिणी भाग). जुन्या करारामध्ये, या भागांना मूळ भाषेच्या मजकुरात "मिसर" आणि "पथ्रोस" असे संदर्भित केले गेले आहे.
  • अनेक वेळा, जेंव्हा कनानमध्ये फारसे अन्न नव्हते, तेव्हा इस्राएली कुटुंबप्रमुखांनी आपल्या कुटुंबासाठी अन्न विकत घेण्यासाठी मिसरला प्रवास केला.
  • कित्येक शेकडो वर्षांपर्यंत इस्राएली मिसरमध्ये गुलाम म्हणून होते.
  • महान हेरोदापासून वाचण्यासाठी योसेफ आणि मरिया हे येशू बाळासोबत मिसरला निघून गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: महान हेरोद, योसेफ, नाईल नदी, कुटुंबप्रमुख)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:04 त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले. नाईल नदीच्या तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता.
  • 08:08 योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.
  • 08:11 मग याकोब आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी मिसरात पाठवतो.
  • 08:14 जरी याकोब आता वृद्ध झाला होता, तरीही तो आपल्या कुटुंबियांसह मिसरात आला व ते सर्व तेथे राहू लागले.
  • 09:01 योसेफ मृत्यु पावल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात राहत होते.

Strong's

  • Strong's: H4713, H4714, G124, G125