mr_tw/bible/names/josephnt.md

5.6 KiB
Raw Permalink Blame History

योसेफ (नवीन करार)

तथ्य:

योसेफ हा येशूचा जगिक पिता होता आणि त्याने त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. तो एक नीतिमान मनुष्य होता, ज्याने सुतार म्हणून काम केले.

  • योसेफ मरिया नावाच्या यहुदी स्त्रीशी वाग्दत्त झाला होता, जेंव्हा ते संलग्न झाले होते, तेंव्हा देवाने मरीयेला येशू मसिहाची आई होण्याकरिता निवडले.
  • देवदुताने योसेफाला सांगितले की, पवित्र आत्मा मरिया गर्भवती राहण्यासाठी अद्भूतरीत्या कारणीभूत झाला, आणि ते मारीयेचे बाळ देवाचे पुत्र होते.
  • येशूचा जन्म झाल्यानंतर, देवदुताने योसेफाला ताकीद दिली की, बाळाला आणि मरीयेला घेऊन हेरोदापासून वाचण्यासाठी मिसरास पळून जा.
  • योसेफ आणि त्याचे कुटुंब नंतर गालील प्रांतातील नासरेथ शहरात राहिले, जेथे त्याने जगण्यासाठी सुतारकाम केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, गालील, येशू, नासरेथ, देवाचा पुत्र, कुमारी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:04 ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते.
  • 23:01 मरीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका धार्मीक पुरुषाबरोबर झाले होते. मरीया गरोदर असल्याचे ऐकून त्याला कळले की, हे बाळ त्याचे नव्हे. तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली.
  • 23:02 देवदूत म्हणाला,योसेफा, मरीयेस तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस. तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे. देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. व त्याचे नाव येशू (अर्थात, ‘देव तारितो’) असे ठेव, कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविल.
  • 23:03 तेंव्हा योसेफाने मरीयेशी विवाह केला व आपली पत्नी म्हणून तिचा स्विकार केला, परंतु त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तो तिच्यापाशी निजला नाही.
  • 23:04 योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.
  • 26:04 येशू म्हणला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेंव्हा सर्व आश्चर्य करु लागले. ‘‘हा योसेफाचा पुत्र ना? ते म्हणू लागले.

Strong's

  • Strong's: G2501