mr_tw/bible/names/galilee.md

3.7 KiB

गालील, गालीली, गालीलातील

तथ्य:

गालील हा शोमरोनाच्या उत्तरेस असलेला, इस्राएलाचा सर्वात उत्तरी भाग होता. "गालीली" हा एक मनुष्य होता, जो गालीलमध्ये राहत होता किंवा जो गालीलात राहत होता.

  • नवीन कराराच्या काळात, गालील, शोमरोन आणि यहूदा हे इस्राएलाचे तीन मुख्य प्रांत होते.
  • गालील हे त्याच्या पश्चिमेस असलेल्या मोठ्या सरोवराने वेढलेले होते, त्याला "गालीलचा समुद्र" असेही म्हंटले जाते.
  • येशू गालीलमधील नासरेथ या गावामध्ये राहिला आणि वाढला.
  • येशूचे बहुतेक चमत्कार आणि शिक्षण हे गालीलच्या प्रांतात घडले.

(हे सुद्धा पहा: नासरेथ, शोमरोन, गालीलचा समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:10 यशया संदेष्टा म्हणाला की मसिहा गालिलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील.
  • 26:01 सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळविल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन आपण राहत असलेल्या गालील या ठिकाणी परत आला.
  • 39:06 शेवटी, लोक म्हणाले, ‘‘आम्हास ठाऊक आहे की तू येशूबरोबर होतास कारण तुम्ही दोघेही गालील प्रदेशातील आहात".
  • 41:06 तेव्हां देवदूत त्यां स्त्रियांना म्हणाला, "जा, आणि शिष्यांना सांगा, 'येशू मरणातून उठला आहे व तो तुमच्यापुढे गालीलास जात आहे.'"

Strong's

  • Strong's: H1551, G1056, G1057