mr_tw/bible/names/saltsea.md

2.4 KiB

क्षार समुद्र, मृत समुद्र

तथ्य:

क्षार समुद्र (ज्याला मृत समुद्र असे देखील म्हणतात) हा दक्षिणी इस्राएलाच्या पश्चिमेस आणि मवाबाच्या पूर्वेच्या मध्ये स्थित होता.

  • यार्देन नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन क्षार समुद्रास मिळते.
  • कारण तो इतर समुद्राहून लहान आहे, म्हणून त्याला "क्षार सरोवर" असे देखील म्हंटले जाऊ शकते.
  • या समुद्रात क्षारांचे (किंवा "मिठाचे") जास्त प्रमाणात केंद्रीकरण असल्यामुळे, त्याच्या पाण्यात कोणीही जगू शकत नाही. त्याच्यात वनस्पती आणि प्राण्यांच्या असलेल्या कमतरतेमुळे त्याचे नाव "मृत समुद्र" असे पडले.
  • जुन्या करारामध्ये, या समुद्राला "अराबाताचा समुद्र" आणि "नेगेवचा समुद्र" असेही म्हंटले जाते, कारण त्याचे स्थान अराबाताच्या आणि नेगेवच्या जवळ आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अम्मोन, अराबात, यार्देन नदी, मवाब, नेगेव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3220, H4417