mr_tw/bible/names/ammon.md

2.1 KiB

अम्मोन, अम्मोनी

तथ्य:

"अम्मोनी लोक" किंवा "अम्मोनी" हा कनान मधील लोकांचा एक गट होता. ते बेन-अम्मीचे वंशज होते, जो लोटाचा मुलगा होता तो त्याला त्याच्या लहान मुलीपासून झाला होता.

  • "अम्मोनी" या शब्दाचा संदर्भ विशेषतः अम्मोनी स्त्री साठी वापरला आहे. याचे भाषांतर "अम्मोनी स्त्री" असेही होऊ शकते.
  • अम्मोनी लोक यार्देन नदीच्या पूर्वेकडील भागात राहत होते आणि ते इस्राएल लोकांचे शत्रू होते.
  • एकदा, अम्मोनी लोकांनी इस्राएलांना शाप देण्याकरता बलाम नावाचा एक संदेष्टा भाड्याने घेतला, पण देवाने त्याला तसे करण्याची परवानगी दिली नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शाप, यार्देन नदी, लोट)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5983, H5984, H5985