mr_tw/bible/other/wine.md

4.8 KiB

द्राक्षरस, कातडी पिशवी(बुधला), बुधले, नवा द्राक्षरस

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "द्राक्षरस" या शब्दाचा संदर्भ द्राक्ष म्हणलेल्या फळांच्या रसापासून बनवलेल्या आंबलेल्या पेयाच्या प्रकाराशी येतो. द्राक्षरसाला "बुधल्यात" साठवले जाते, जे प्राण्यांच्या कातडीपासून बनलेले पात्र होते.

  • "नवीन द्राक्षरस" ह्याचा संदर्भ द्राक्षरासाशी आहे, ज्याला नुकतेच द्र्क्षापासून काढण्यात आले होते, आणि त्याला अजून आंबवण्यात आलेले नाही. काहीवेळा "द्राक्षरस" हा शब्द न आंबवलेल्या द्राक्षाच्या रसाला संदर्भित करतो.
  • द्राक्षरस बनवण्यासाठी, द्राक्षांना द्राक्षकुंडामध्ये चिरडले जाते, जेणेकरून त्यातून रस बाहेर येतो. रस अखेरीस आंबतो आणि त्यापासून दारू तयार होते.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, जेवणाबरोबर द्राक्षरस हे सर्वसाधारण पेय होते. आजच्या द्राक्षरसामध्ये जितके दारूचे प्रमाण आहे, तितके प्रमाण त्या वेळेस नव्हते.
  • जेवणाच्यावेळी द्राक्षरसाची व्यवस्था करताना, सहसा ते पाण्यामध्ये मिसळले जाते.
  • जे बुधले जुने आणि ठिसूळ होते, त्याला चिरा पडत आणि त्यातून द्राक्षरस बाहेर पडत असे. नवीन बुधले मऊ आणि लवचिक असत, ज्याचा अर्थ असा की ते सहज फाटले जात नसत आणि त्यामध्ये द्राक्षरस सुरक्षितपणे साठवला जाऊ शकत होता.
  • जर तुमच्या संस्कृतीमध्ये द्राक्षरस माहित नसेल तर, ह्याचे भाषांतर "आंबवलेला द्राक्षांचा रस" किंवा "द्राक्ष म्हणलेल्या फळांपासून बनवलेले आंबवलेले पेय" किंवा "अंबवलेला फळांचा रस" असे केले जाऊ शकते. (पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे)
  • "बुधले" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "द्राक्षरसाची पिशवी" किंवा "प्राण्यांच्या कातडीची द्राक्षरसाची पिशवी" किंवा "प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले द्राक्षरसाचे पात्र" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: द्राक्ष, द्राक्षरस, द्राक्षमळा, द्राक्षकुंड)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

सजवले

Strong's

  • Strong's: H2561, H2562, H3196, H4469, H4997, H5435, H6025, H6071, H8492, G1098, G3631, G3820, G3943