mr_tw/bible/other/grape.md

2.8 KiB

द्राक्ष, द्राक्षे, द्राक्षवेल

व्याख्या:

द्राक्ष हे लहान, गोल, आणि मऊ त्वचा असलेले, बेरासारखे फळ आहे, जे वेलींवर समूहामध्ये वाढते. द्राक्ष्यांचा रसाचा उपयोग द्राक्षरस (मदिरा) बनवण्यासाठी केला जातो.

  • वेगवेगळ्या रंगाची द्राक्षे आढळतात, जसे की, फिक्कट हिरवा, जांभळा, किंवा लाल.
  • एकटे द्राक्ष हे सुमारे एक ते तीन सेंटीमीटर आकाराचे असते.
  • लोक जेथे द्राक्ष वाढवतात, त्याला द्राक्षमळा असे म्हणतात. ह्यामध्ये सहसा वेलींच्या लांब रांगा असतात.
  • पवित्रशास्त्राच्या काळात, द्राक्षे हे महत्वाचे अन्न होते, आणि द्राक्षमळा असणे हे संपत्तीचे प्रतिक होते.
  • द्राक्ष्यांना कुजण्यापासून वाचवण्यासाठी, लोक सहसा त्यांना सुकवत असत. सुकवलेल्या द्रक्ष्यांना "बेदाणे" असे म्हणतात, आणि त्याचा उपयोग बेदाण्याचा केक बनवण्यासाठी केला जायचा.
  • येशूने, त्याच्या शिष्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी द्राक्षमळ्याची बोधकथा सांगितली.

(हे सुद्धा पहा: वेल, द्राक्षमळा, द्राक्षरस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H811, H891, H1154, H1155, H1210, H2490, H3196, H5563, H5955, H6025, H6528, G288, G4718