mr_tw/bible/other/vine.md

2.5 KiB

द्राक्षवेल, द्राक्षवेली

व्याख्या:

"द्राक्षवेल" या शब्दाचा संदर्भ वनस्पतीशी येतो, जे जमिनींच्या बरोबर पिछाडीने वाढते, किंवा दुसऱ्या झाडावर किंवा रचनेवर चढून वाढते. पवित्र शास्त्रामध्ये, "द्राक्षवेल" या शब्दाचा उपयोग फक्त फळ धारण करणाऱ्या द्राक्षवेलींसाठी केला आहे, आणि त्याचा सहसा संदर्भ द्राक्षांच्या वेलीसाठी येतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "द्राक्षवेल" या शब्दाचा अर्थ नेहमी "द्राक्षांची वेल" असा होतो.
  • द्राक्षवेलीच्या फांद्या मुख्य खोडाशी जोडलेल्या असतात, जे त्यांना वाढीसाठी लागणारे पाणी आणि इतर पोषकतत्वे पुरवते.
  • येशूने स्वतःला "द्राक्षवेल' आणि त्याच्या लोकांना त्याचे "फाटे (फांद्या)" असे म्हंटले. या संदर्भामध्ये, "द्राक्षवेल" या शब्दाचे भाषांतर "द्राक्षाच्या वेलीचे खोड" किंवा "द्राक्षाच्या वनस्पतीचे खोड" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: द्राक्ष, द्राक्षमळा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5139, H1612, H8321, G288, G290, G1009, G1092