mr_tw/bible/other/winepress.md

2.4 KiB

द्राक्षकुंड

व्याख्या:

पवित्र शास्त्राच्या काळात, "द्राक्षकुंड" हे एक मोठे भांडे किंवा खुली जागा होती, जिथे द्राक्षरस बनवण्यासाठी द्राक्षांचा रस काढला जात होता.

  • इस्राएलमध्ये, द्राक्षकुंड हे सहसा मोठे, पसरलेले कुंड होते, ज्याला कठीण खडकामध्ये खोदून बनवले जात होते. द्राक्ष्यांचे घड तळाच्या छिद्राशेजारी ठेवतात आणि लोक द्राक्ष्याला त्यांच्या पायांनी तुडवतात, जेणेकरून द्रक्ष्यांचा रस बाहेर वाहून येईल.
  • सहसा द्राक्षकुंडाला दोन स्तर असतात, ज्यामध्ये वरच्या स्तरामध्ये द्राक्षे तुअदावली जातात, जेणेकरून त्यांचा रस खालच्या स्तरात वाहून जातो, जिथून त्याला गोळा करतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "द्राक्षकुंड" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, दुष्ट लोकांच्यावर देवाचा क्रोध ओतण्याच्या चित्रासाठी सुद्धा केला जातो. (पहा: रूपक)

(हे सुद्धा पहा: द्राक्ष, क्रोध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1660, H3342, H6333, G3025, G5276