mr_tw/bible/other/wheat.md

2.5 KiB

गहू

व्याख्या:

गहू हे एक प्रकारचे धान्य आहे, ज्याचे लोक अन्न म्हणून उत्पादन करतात. पवित्र शास्त्रामध्ये जेंव्हा "धान्य" किंवा "बीज" ह्याचा उल्लेख येतो, तेंव्हा बऱ्याचदा हे गव्हाचे धान्य किंवा बीज ह्याच्या संबंधी सांगत असते.

  • गव्हाचे बीज किंवा दाणे हे गव्हाच्या वनस्पतीच्या टोकाला लागतात.
  • गव्हाची कापणी केल्यानंतर, धान्याच्या दाण्यांना वनस्पतीच्या देठापासून मळणी करून वेगळे केले जाते. गव्हाच्या वनस्पतीच्या देठाला "पेंढा" असे म्हणतात, आणि बऱ्याचदा ह्याला जमिनीवर जनावरांना झोपण्यासाठी अंथरले जाते.
  • मळणीनंतर, धान्याच्या बीजाच्या सभोवताली असलेल्या भुसकटाला उफणून धान्यापासून वेगळे केले, आणि दूर फेकले जाते.
  • लोक गव्हाला दळून त्याचे पीठ तयार करतात, आणि त्याचा उपयोग चपाती बनवण्यासाठी केला जातो.

(हे सुद्धा पहा: जव](../other/barley.md), भुसकट, धान्य, बीज, मळणी, उफाणने)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1250, H2406, G4621