mr_tw/bible/other/winnow.md

4.2 KiB

उफणणे, उडवून लावणे, मळणी केलेल्या, सूप, चाळणे, स्वच्छ करणे

व्याख्या:

"उफणणे" आणि "चाळणे" या शब्दांचा अर्थ नको असलेल्या वस्तूंपासून धान्याला वेगळे करणे असा होतो. * पवित्र शास्त्रामध्ये, दोन्ही शब्दांचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, लोकांना बाजूला किंवा वेगळे करण्याच्या संदर्भात केला जातो.

  • "उफणणे" म्हणजे धान्याला आणि भूसकटाला हवेमध्ये उडवून, हवेला भूसकटाला दूर वाहून नेण्याची परवानगी देऊन, धान्याला नको असलेल्या वनस्पतीच्या भागापासून वेगळे करणे.
  • "चाळणे" या शब्दाचा संदर्भ उफणलेल्या धान्याला चाळणीमध्ये घेऊन हलवण्याशी आहे, जेणेकरून नको असलेल्या शिल्लक राहिलेल्या वस्तू जसे की, माती किंवा खडे ह्यांच्यापासून सुटका होईल.
  • जुन्या करारामध्ये, "उफणणे" आणि "चाळणे" ह्यांचा उपयोग लाक्षणिक अर्थाने कष्टाचे वर्णन करण्यासाठी केला आहे, जे नीतिमान लोकांना अनीतिमान लोकांपासून वेगळे करते.
  • येशूने सुद्धा "चाळणे" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने केला, जेंव्हा तो शिमोन पेत्राला सांगत होता की, कसे त्याला आणि इतर शिष्यांना त्यांच्या विश्वासामध्ये पारखले जाईल.
  • या शब्दांचे भाषांतर करताना, प्रकल्पित भाषेतील अशा शब्दांचा किंवा वाक्यांशाचा उपयोग करा ज्याचा संदर्भ या उपक्रमांशी येईल; शक्य भाषांतर कदाचित "थरथरणाऱ्या स्वरुपात" किंवा "हवा घालण्याच्या स्वरुपात" केले जाऊ शकते. जर "उफणणे" किंवा "स्वच्छ करणे" हे माहित नसेल तर, या शब्दांचे भाषांतर अशा शब्दाने, ज्याचा संदर्भ धान्याला भूसकटापासून किंवा धुळीपासून वेगळे करण्याची एक पद्धत किंवा या पद्धतीचे वर्णन करून केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: भूसकट, धान्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2219, H5128, H5130, G4425, G4617