mr_tw/bible/other/seed.md

4.5 KiB

बीज, वीर्य

व्याख्या:

बीज हा वनस्पतीचा एक भाग आहे, ज्याला त्याच प्रकारच्या आणखी वनस्पतींचे उत्पादन करण्यासाठी जमिनीमध्ये रोवले जाते. या शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ देखील आहेत.

  • "बीज" या शब्दाचा संदर्भ लाक्षणिक अर्थाने आणि शोभनभाषित अर्थाने, मनुष्यातील छोट्या पेशींशी आहे, जे स्त्रीच्या पेशीशी मिसळून, तिच्यामध्ये बाळाची वाढ होण्यास कारणीभूत होते. ह्याच्या संग्रहाला वीर्य असे म्हणतात.
  • ह्याच्या संबंधित, "बीज" देखील एका व्यक्तीच्या संतती किंवा वंशजांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
  • या शब्दाचा सहसा अनेकवचनी अर्थ होतो, जो एकापेक्षा अधिक बी धान्याला किंवा एकापेक्षा अधिक वंशजांना संदर्भित करतो.
  • बी पेरणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टांतात, येशूने त्याच्या बियांची तुलना देवाच्या वचनांशी केली, जे लोकांच्या हृदयामध्ये चांगली आत्मिक फळे उत्पन्न करण्यासाठी पेरले जाते.
  • प्रेषित पौलाने सुद्धा "बीज" या शब्दाला देवाच्या वचन संदर्भित करण्यासाठी वापरले आहे.

भाषांतर सूचना

  • प्रत्यक्षात बीजसाठी, "बीज" या शब्दासाठी लक्षित भाषेतील शब्दशः शब्द वापरणे, जे शेतकरी त्याच्या शेतामध्ये लावण्यासाठी वापरतो त्याचा उपयोग करणे सर्वोत्तम राहील.
  • या शब्दाचा शब्दशः उपयोग, देवाच्या वचनात लाक्षणिकरित्या दर्शवलेल्या संदर्भांमध्ये केला पाहिजे.
  • लाक्षणिक अर्थाच्या उपयोगासाठी, ज्याचा संदर्भ अशा लोकांशी आहे, जे एकाच कुटुंबातील आहेत, त्या साठी बीजऐवजी "वंश" किंवा "वंशज" असे शब्द वापरण्याने अधिक स्पष्ट होईल. काही भाषांमध्ये एक शब्द असू शकतो ज्याचा अर्थ "मुले आणि नातवंडे" असा होतो.
  • स्त्री किंवा पुरुषाच्या "बीज" साठी, हे लक्षित अभिव्यक्ती कश्या प्रकारे व्यक्त करते, ज्यामुळे लोकांचे मन दुखवणार किंवा गोंधळले जाणार नाही ह्याचा विचार करा. (पहा: युफेमिसम

(हे सुद्धा पहा: वंशज, संतती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2232, H2233, H2234, H3610, H6507, G4615, G4687, G4690, G4701, G4703