mr_tw/bible/other/slaughter.md

3.7 KiB

मारून टाकणे (कत्तल करणे), ठार मारले, ठार मरणे

व्याख्या:

"कत्तल करणे" या शब्दाचा संदर्भ, मोठ्या संख्येने प्राण्यांना किंवा लोकांना मारणे, किंवा विध्वंसक पद्धतीने मारणे ह्याच्या संबंधात येतो. ह्याचा संदर्भ प्राण्याला खाण्याच्या हेतूने मारण्याशी सुद्धा येतो. * ठार करण्याच्या कृत्याला "कत्तल करणे" असेही म्हणतात.

  • जेंव्हा अब्राहमाला वाळवंटात, त्याच्या तंबूजवळ तिघांनी भेट दिली, तेंव्हा त्याने त्याच्या सेवकाला, त्याच्या पाहुण्यांसाठी एक कालवड मारून तिला शिजवण्याची आज्ञा दिली.
  • यहेज्केल संदेष्ट्याने भविष्यवाणी केली की, जे लोक देवाची वचने पाळत नाहीत, त्या सर्वांची कत्तल करण्यासाठी, तो त्याच्या दुताला पाठवून देईल.
  • 1 शमुवेल मध्ये मोठ्या कत्तलेची नोंद केलेली आहे, ज्यामध्ये इस्राएली लोकांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे, त्यांच्या शत्रूकडून 30000 इस्राएली लोकांना मारण्यात आले.
  • "कत्तल करण्याचे शस्त्र" ह्याचे भाषांतर, "मारण्याचे शास्त्र" असे केले जाऊ शकते.
  • "खूप मोठी कत्तल झाली" या अभिव्यक्तीचे भाषांतर, "मोठ्या संख्येने लोक मारले गेले" किंवा "मेलेल्या लोकांचा आकडा खूप मोठा होता" किंवा "भयंकर मोठ्या संख्येने लोक मेले" असे केले जाऊ शकते.
  • "कत्तल करणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "मारणे" किंवा "वध करणे" किंवा "हत्या करणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: देवदूत, गाय, अवज्ञा, यहेज्केल, सेवक, वध करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2026, H2027, H2028, H2076, H2491, H2873, H2874, H2878, H4046, H4293, H4347, H4660, H5221, H6993, H7524, H7819, H7821, G2871, G4967, G4969, G5408