mr_tw/bible/other/disobey.md

4.6 KiB

न ऐकणे (अवज्ञा), अवमान करणे, आज्ञेचे उल्लंघन केले (आज्ञा मोडली), आज्ञाभंग, उलटून बोलणारे (आज्ञा न मानणारा)

व्याख्या:

"अवज्ञा" या शब्दाचा अर्थ एखादा जो अधिकारामध्ये आहे त्याने जी आज्ञा केली किंवा सूचना केली त्याचे पालन न करणे असा होतो. जो व्यक्ती असे करतो तो "आज्ञा न मानणारा" आहे.

  • एखादा व्यक्ती ज्याला एखादी गोष्ट करू नको असे सांगितले असताना, तो ती करतो तो आज्ञा पाळत नसतो.
  • न ऐकणे ह्याचा अर्थ ज्याची आज्ञा केली आहे ती गोष्ट करण्यास नकार देणे असा होतो.
  • "आज्ञा न मानणारा" या शब्दाचा उपयोग एखादा, जो सवयीप्रमाणे ऐकत नाही किंवा बंड करतो, त्याच्या चारित्र्य गुणांचे वर्णन करण्याकरिता केला जातो. ह्याचा अर्थ ते पापमय किंवा दुष्ट आहेत असा होतो.
  • "आज्ञाभंग" या शब्दाचा अर्थ "आज्ञा न पाळण्याची कृती" किंवा "देवाच्या इच्छेविरुद्ध वर्तन करणे" असा होतो.
  • "आज्ञेचे उल्लंघन करणारे लोक" ह्याचे भाषांतर "असे लोक जे आज्ञा मोडत राहतात" किंवा "असे लोक जे देवाने आज्ञापिल्याप्रमाणे करत नाहीत" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अधिकार, दुष्ट, पाप, आज्ञा पाळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 02:11 देव मनुष्यास म्हणाला, “ तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस व माझी आज्ञा मोडलीस.
  • 13:07 जर त्यांनी हे सर्व नियम पाळले, तर देवाने त्यांना आशीर्वाद व संरक्षण देण्याचे अभिवचन दिले. जर त्यांनी त्याचे उल्लंघन केले, तर देव त्यांना शासन करील.
  • 16:02 इस्त्राएलांनी सतत देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे, देवाने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या पुढे पराभूत करून शिक्षा दिली.
  • 35:12 ”थोरला पुत्र आपल्या पित्यास म्हणाला, ‘एवढी वर्षे मी तुम्हासाठी विश्वासूपणे काम करत आहे! मी तुमच्या आज्ञेच्या पलिकडे काहीही केले नाही, तरिही तुम्ही माझ्या मित्रांसोबत आनंद करण्यासाठी एक लहानसे करडूही दिले नाही.

Strong's

  • Strong's: H4784, H5674, G506, G543, G544, G545, G3847, G3876