mr_tw/bible/names/ezekiel.md

2.0 KiB

यहेज्केल

तथ्य:

हद्दपार केलेल्या काळात, जेंव्हा अनेक यहुद्यांना बाबेलास नेण्यात आले, तेंव्हा यहेज्केल हा देवाचा संदेष्टा होता.

  • जेंव्हा यहेज्केल यहुदाच्या राज्यात राहणारा एक याजक होता, तेंव्हा बाबेली सैन्याने त्याला व इतर अनेक यहुद्यांना पकडले होते.
  • वीस वर्षे, तो व त्याची बायको बाबेलामधील एका नदीजवळ राहत होते, आणि यहूदी लोक देवाचा संदेश त्याच्याकडून ऐकण्यासाठी तिथे येत होते.
  • इतर गोष्टींबरोबरच, यहेज्केलने यरूशलेमेचे व मंदिराचे नाश व पुनर्वसन यांच्या बद्दल भविष्यवाणी केली.
  • त्याने मशीहाच्या भावी राज्याविषयी देखील भविष्यवाणी केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेली, ख्रिस्त, हद्दपार, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3168