mr_tw/bible/other/perverse.md

4.5 KiB

विकृत, कबुली देतील (हेकटपणे), निसर्गाविरुद्ध (विकृती), विकृत्या, विपरीत, भडकावणे, विकृत, दिशाभूल

व्याख्या:

"विकृत" या शब्दाचा उपयोग एखाद्या व्यक्तीचे किंवा कृत्याचे वर्णन करण्यसाठी केला जातो, जे नैतिकदृष्ट्या कुटील किंवा पिळले जाणारे आहे. "हेकटपणे" या शब्दाचा अर्थ "विकृत पद्धतीने" असा होतो. एखादी गोष्ट "विपरीत" करणे म्हणजे तिला जे योग्य किंवा चांगले आहे त्यापासून पिळणे किंवा वळवून दूर नेणे.

एखादा व्यक्ती किंवा एखादी गोष्ट जी विकृत आहे, ती जे काही चांगले किंवा योग्य आहे त्यापासून विचलित केलेली आहे.

  • पवित्र शास्त्रामध्ये, इस्राएली लोक हेकटपणे वागले, जेंव्हा त्यांनी देवाची आज्ञा पाळण्याचे सोडून दिले. त्यांनी खोट्या देवांची उपासना करून बऱ्याचदा असे केले.
  • देवाच्या आदर्शाच्या किंवा स्वभावाच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही कृतीला विकृत असे समजले जाते.
  • "विकृत" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "नैतिकदृष्ट्या पिळलेला" किंवा "अनैतिक" किंवा "देवाच्या सरळ मार्गापासून वळून दूर गेलेला" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.
  • "विकृत भाषा" ह्याचे भाषांतर "दुष्ट पद्धतीने बोलणे" किंवा "कापती बोलणे" किंवा "बोलण्याचा अनैतिक मार्ग" असे केले जाऊ शकते.
  • "विकृत लोक" ह्याचे वर्णन "अनैतिक लोक" किंवा "नैतिक मार्गापासून ढळलेले लोक" किंवा "देवाची सतत अवज्ञा करणारे लोक" असे केले जाऊ शकते.
  • "हेकटपणे वागणे" या वाक्यांशाचे भाषांतर, "दुष्ट पद्धतीने वागणे" किंवा "देवाच्या आज्ञेविरुद्ध गोष्टी करणे" किंवा "देवाचे शिक्षण नाकारील अशा पद्धतीने वागणे" असे केले जाऊ शकते.
  • "विपरीत" या शब्दाचे भाषांतर "भ्रष्ट होण्यास कारणीभूत" किंवा "कोणत्यातरी वाईटाकडे वळणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: भ्रष्ट, फसवणे, अवज्ञा, दुष्ट, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1942, H2015, H3399, H3868, H3891, H4297, H5186, H5557, H5558, H5753, H5766, H5773, H5791, H5999, H6140, H6141, H8138, H8397, H8419, G654, G1294, G3344, G3859