mr_tw/bible/other/turn.md

7.7 KiB

वळणे, वळेल, पाठ फिरवणे (सोडून जाने), दूर फिरवणे (दूर करणे), परत जाणे, परत फिरणे, वळले, पाठ फिरवली, परत गेले, पासून फिरणे, मागे फिरणे, परत येणे, परत गेले, परत जाण्यास निघणे, परत येणे

व्याख्या:

"वळणे" ह्याचा अर्थ, भौतिकरीत्या दिशा बदलणे किंवा एखाद्या वस्तूला दिशा बदलण्यास भाग पडणे असा होतो.

  • "वळणे" या शब्दाचा अर्थ, मागे बघण्यासाठी "बाजूला वळणे" किंवा दुसऱ्या दिशेला चेहरा करणे असा देखील होतो.
  • "मागे वळणे" किंवा "सोडून जाणे" ह्याचा अर्थ "माघारी जाणे" किंवा "दूर जाणे" किंवा "दूर जाण्यास भाग पाडणे" असा होतो.
  • "च्या पासून दूर जाणे" ह्याचा अर्थ काहीतरी करणे "थांबवणे" किंवा एखाद्याला नाकारणे असा होतो.
  • एखाद्याकडे "वळणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीकडे थेट बघणे असा होतो.
  • "वळणे आणि सोडणे" किंवा "सोडून जाण्यासाठी त्याने त्याची पाठ वळवली" ह्याचा अर्थ "दूर जाणे" असा होतो.
  • "च्या कडे परत वळणे" ह्याचा अर्थ "एखादी गोष्ट करण्यास परत सुरवात करणे" असा होतो.
  • "च्या पासून दूर जाणे" ह्याचा अर्थ "काहीतरी करणे "थांबवणे" असा होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "वळणे" ह्याचे भाषांतर "दिशा बदलणे" किंवा "जाणे" किंवा "हालणे" असा होतो.
  • काही संदर्भांत, "वळणे" या शब्दाचे भाषांतर एखाद्याला काहीतरी करण्यास "भाग पाडणे" असे केले जाऊ शकते. * "(कोणीतरी) पासून दूर जाणे" ह्याचे भाषांतर "(एखाद्याला) दूर जाण्यास भाग पाडणे" किंवा "(एखाद्याला) थांबण्यास भाग पाडणे" असे केले जाऊ शकते.
  • "देवापासून दूर जाणे" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाची उपासना करणे थांबवणे" असे केले जाऊ शकते.
  • "देवाकडे परत वळणे" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाची उपासना करणे पुन्हा सुरु करणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा शत्रू "मागे वळतो" ह्याचा अर्थ तो "माघार घेतो" असा होतो. "शत्रूला मागे वळवणे" ह्याचा अर्थ "शत्रूला माघार घ्यायला भाग पाडणे" असा होतो.
  • लाक्षणिकरित्या वापरले जाते, जेंव्हा इस्राएल लोक खोट्या "देवांकडे वळले," तेंव्हा ते त्याची उपासना करू लागले. जेंव्हा त्यांनी मुर्त्यांपासून "पाठ फिरवली," तेंव्हा त्यांनी त्यांची "उपासना करणे थांबवले"
  • जेंव्हा देव त्याच्या बंडखोर लोकांना "सोडून गेला" तेंव्हा त्याने त्यांचे "संरक्षण करणे" किंवा त्यांना "मदत करणे" थांबवले.
  • "वडिलांची मने त्यांच्या मुलांकडे वळवा" या वाक्यांशाचे भाषांतर "वडिलांना त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास पुन्हा भाग पाडा" असे केले जाऊ शकते.
  • "माझ्या सन्मानाला लाजेमध्ये वळवा" या वाक्यांशाचे भाषांतर "माझा सन्मान लाज बनण्यास कारणीभूत व्हा" किंवा "माझी अप्रतिष्ठा करा म्हणजे मला लाज वाटेल" किंवा "(जे दुष्ट आहे ते करून) मला लाज आना, म्हणजे लोक माझा सन्मान करणार नाहीत.
  • "मी तुमच्या शहरांचा नाश करेन" ह्याचे भाषांतर "मी तुमची शहरे नाश होण्यास भाग पाडीन" किंवा "शत्रूंनी येऊन तुमची शहरे नाश करण्यास मी कारणीभूत होईन" असे केले जाऊ शकते.
  • "च्या मध्ये बदलणे" या वाक्यांशाचे भाषांतर "बनणे" असे केले जाऊ शकते. जेंव्हा मोशेची काठी सापामध्ये "बदलली," म्हणजे ती साप बनली. ह्याचे भाषांतर "बदलले" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, कुष्ठरोग उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H541, H1750, H2015, H2017, H2186, H2559, H3399, H3943, H4142, H4672, H4740, H4878, H5186, H5253, H5414, H5437, H5472, H5493, H5528, H5627, H5753, H5844, H6437, H6801, H7227, H7725, H7734, H7750, H7760, H7847, H8159, H8447, G344, G387, G402, G576, G654, G665, G868, G1294, G1578, G1612, G1624, G1994, G2827, G3179, G3313, G3329, G3344, G3346, G4762, G5077, G5157, G5290, G6060