mr_tw/bible/kt/worship.md

5.5 KiB
Raw Permalink Blame History

उपासना (आराधना)

व्याख्या:

"उपासना" करणे म्हणजे एखाद्याला, विशेषकरून देवाला सन्मान, स्तुती देणे आणि त्याची आज्ञा पाळणे.

  • या शब्दाचा सहसा अर्थ, एखाद्याला नम्रपणे सन्मान देण्यासाठी, अक्षरशः "खाली वाकणे" किंवा "साष्टांग नमस्कार घालणे" असा होतो.
  • जेव्हा आपण त्याची सेवा आणि त्याचा सन्मान करतो, तेव्हा त्याची स्तुती आणि त्याची आज्ञा मानून, आम्ही देवाची उपासना करतो.
  • जेंव्हा इस्राएली लोकांनी देवाची उपासना केली, तेंव्हा सहसा त्यात वेदीवर प्राण्यांचे बलिदान देण्याचा समावेश होता.
  • काही लोकांनी खोट्या देवांची उपासना केली.

भाषांतर सूचना

  • "उपासना" या शब्दाचे भाषांतर "च्या पर्यंत खाली वाकणे" किंवा "सन्मान आणि सेवा करणे" किंवा "सन्मान करणे आणि आज्ञा पाळणे" असे केले जाऊ शकते.
  • काही संदर्भामध्ये, ह्याचे भाषांतर "नम्रपणे स्तुती करणे" किंवा "स्तुती आणि सन्मान देणे" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बलिदान, स्तुती, सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 13:04 मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य देवतांची पूजा करू नका."
  • 14:02 कनानी लोक देवाची आराधना करीत नव्हते व त्याची आज्ञा मानत नव्हते. ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
  • 17:06 दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होतो ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील.
  • 18:12 सर्व राजे व इस्त्रायलाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तीची पूजा करु लागले.
  • 25:07 येशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो! देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!
  • 26:02 शब्बाथ दिवशी, तो उपासना करीत त्या ठिकाणी गेला.
  • 47:01 तेथे त्यांना लुदिया नावाची एक व्यापारी स्त्री भेटली. तिचे देवावर प्रेम होते व ती देवाची भक्ती करणारी होती.
  • 49:18 देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो.

Strong's

  • Strong's: H5457, H5647, H6087, H7812, G1391, G1479, G2151, G2318, G2323, G2356, G3000, G3511, G4352, G4353, G4573, G4574, G4576