mr_tw/bible/other/deceive.md

5.2 KiB

फसवणे, फसवतो, फसवला जाणे, फसवत राहणे, फसवणूक, फसवणारा, फसवे, कपटी, कपटाने, फसगत, फसवणूक, फसवे, भ्रामक

व्याख्या:

"फसवणे" या शब्दाचा अर्थ जी गोष्ट खरी नाही, त्या गोष्टीवर एखाद्याला विश्वास ठेवायला भाग पाडणे. एखाद्याला फसवण्याच्या कृत्याला "फसवणूक" असे म्हणतात.

अजून एक संज्ञा "फसवणूक" ह्याचा संदर्भ जी गोष्ट खरी नाही, त्या गोष्टीवर एखाद्याला विश्वास ठेवायला भाग पाडण्याच्या कृत्याशी आहे.

  • दुसऱ्यांना काहीतरी खोट्यावर विश्वास ठेवायला लावणाऱ्याला "फसवा" असे म्हणतात. उदाहरणार्थ, सैतानाला "फसवा" असे म्हंटले आहे. दुष्ट आत्मे ज्यांना तो नियंत्रित करतो, त्यांना सुद्धा फसवे असे म्हणतात.
  • एक व्यक्ती, कृती किंवा संदेश जो सत्य नाही, त्याचे "भ्रामक" म्हणून वर्णन करता येईल.

"फसवणूक" आणि "कपट (फसवणूक)" ह्यांचा समान अर्थ आहे, परंतु ते कसे वापरले जातात याबद्दल काही लहान फरक आहेत.

  • "कपटी" आणि "फसवे" या वर्णनात्मक शब्दांचे अर्थ समान आहेत आणि समान संदर्भांमध्ये वापरले जातात.

भाषांतर सूचना

  • "फसवणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "खोटे बोलणे" किंवा "चुकीचा विश्वास ठेवण्यास भाग पाडणे" किंवा "एखाद्याला जे सत्य नाही त्याच्यावर विचार करावयास भाग पाडणे" असे केले जाऊ शकते.
  • "फसवले" या शब्दाचे भाषांतर "चुकीच्या गोष्टीवर विचार करावयास भाग पाडले" किंवा "खोटे बोलले" किंवा "फसवले" किंवा "मूर्ख बनवले" किंवा "दिशाभूल केली" असे केले जाऊ शकते.
  • "फसवणारा" ह्याचे भाषांतर "खोटारडा" किंवा "दिशाभूल करणारा" किंवा "फसवणारा असा कोणी" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "भ्रामक" किंवा "कपटी" ह्यांचे भाषांतर "खोटेपणा" किंवा "खोटे बोलणे" किंवा "फसवणूक" किंवा "बेईमानी" असे केले जाऊ शकते.
  • "भ्रामक" किंवा "फसवा" या शब्दाचे भाषांतर "असत्य" किंवा "दिशाभूल करणारे" किंवा "खोटे बोलणे" असे केले जाऊ शकते, ते अशा व्यक्तीचे वर्णन करतात, जो असे बोलतो किंवा कृती करतो, ज्यामुळे जे लोक सत्य नसलेल्या अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

(हे सुद्धा पहा: खरे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{tag>publish ktlink}

Strong's

  • Strong's: H898, H2048, H3577, H3584, H4123, H4820, H4860, H5230, H5377, H6121, H6231, H6280, H6601, H7411, H7423, H7683, H7686, H7952, H8267, H8496, H8501, H8582, H8591, H8649, G538, G539, G1386, G1387, G1388, G1389, G1818, G3884, G4105, G4106, G4108, G5422, G5423