mr_tw/bible/other/freewilloffering.md

3.1 KiB

स्वखुशीचे अर्पण, स्वखुशीची अर्पणे

व्याख्या:

"स्वखुशीचे अर्पण" हे देवाला द्यावयाचे अशा प्रकारचे अर्पण होते, जे मोशेच्या नियमांनुसार देणे गरजेचे नव्हते. हे अर्पण करणे, ही त्या व्यक्तीची वैयक्तिक इच्छा होती.

  • जर स्वखुशीच्या अर्पनामध्ये प्राण्याचे बलिदान करावयाचे असेल तर, त्या प्राण्यामध्ये थोडा दोष असला तरीही तो स्वीकारण्यात येत असे, कारण ते स्वेच्छेने अर्पण करण्यात येत असे.
  • इस्राएली लोकांनी उत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून बलिदान केलेल्या प्राण्याला खाल्ले.
  • जेंव्हा स्वखुशीचे अर्पण दिले जात होते, तेंव्हा हे इस्राएलासाठी आनंदाचे कारण होत असे, कारण ते हे दर्शवत असे की, आलेले पिक हे चांगले आहे, म्हणून लोकांच्याकडे पुष्कळ अन्न आहे.
  • एज्राच्या पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारच्या स्वखुशीच्या अर्पनांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी देण्यात आले होते. या अर्पनामध्ये सोने आणि चांदीच्या पैश्यांचा समावेश होता, त्याचबरोबर, सोने आणि चांदीपासून बनवलेले कातोरे आणि इतर वस्तूंचा देखील समावेश होता.

(हे सुद्धा पहा: होमार्पण, एज्रा, उत्सव, धान्यार्पण, दोषार्पण, नियम, पापार्पण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5068, H5071