mr_tw/bible/other/feast.md

3.8 KiB

मेजवानी, सण, आनंदोत्सव (मेजवान्या)

व्याख्या:

"मेजवानी" या शब्दाचा संदर्भ एखाद्या घटनेशी आहे, जिथे लोकांचा समूह खूप मोठे जेवण एकत्र येऊन करतो, सहसा काहीतरी साजरे करण्याच्या हेतूने. "मेजवानी" करण्याची क्रिया म्हणजे मोठ्या प्रमाणावर खाणे किंवा मेजवानीमध्ये एकत्र खाण्यासाठी भाग घेणे.

  • सहसा विशिष्ठ मेजवानीच्या वेळी, विशेष प्रकारचे अन्न खाण्याचे असते.
  • धार्मिक उत्सव ज्यांना देवाने यहुद्यांना साजरे करण्याची आज्ञा दिली, त्यामध्ये सामान्यतः एकत्र मेजवानी करण्याचा समावेश होतो. ह्याच कारणास्तव, बऱ्याचदा उत्सवांना "सण" असे म्हंटले जाते.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, राजे आणि इतर श्रीमंत आणि शक्तिशाली लोक सहसा त्यांच्या कुटुंबांचे किंवा मित्रांचे मनोरंजन करण्याकरिता मेजवान्या देत.
  • हरवलेल्या पुत्राच्या गोष्टीमध्ये, पित्याने त्याच्या पुत्राचे परतणे साजरे करण्यासाठी, विशेष मेजवानी तयार केली.
  • एखादी मेजवानी ही काही दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस चालायची.
  • "मेजवानी" या शब्दाचे भाषांतर "उदारपणे खाणे" किंवा "खूप सारे अन्न खाऊन साजरा करणे" किंवा "विशेष, मोठे जेवण खाणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "मेजवानी" ह्याचे भाषांतर "एकत्र येऊन मोठे जेवण साजरे करणे" किंवा "खूप साऱ्या अन्नपदार्थाबरोबर जेवणे" किंवा "एका उत्सवाचे जेवण" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: उत्सव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H398, H2077, H2282, H2287, H3899, H3900, H4150, H4580, H4797, H4960, H7646, H8057, H8354, G26, G755, G1062, G1173, G1403, G1456, G1858, G1859, G2165, G3521, G4910