mr_tw/bible/names/miriam.md

3.0 KiB

मिर्याम

तथ्य:

मिर्याम ही अहरोन आणि मोशे ह्यांची मोठी बहिण होती.

  • जेंव्हा ती तरुण होती, तेंव्हा मिर्यामच्या आईने तिला तिचा लहान भाऊ मोशेवर लक्ष ठेवण्याची सूचना दिली होती, ज्याला लव्हाळ्याच्या टोपलीमध्ये नाईल नदीत सोडले होते. जेंव्हा फारोच्या मुलीला ते बाल सापडले आणि तिच्यासाठी त्या बाळाची देखभाल करणाऱ्या कोणाला तरी शोधात असता, मिर्यामने तिच्या आईला ते करण्यासाठी आणले.
  • जेंव्हा इस्राएली लोक मिसऱ्यांच्या तावडीतून तांबडा समुद्र पार करून सुटले, तेंव्हा मिर्यामने इस्राएली लोकांचे आनंदाच्या आणि आभार प्रदर्शनाच्या नाचात नेतृत्व केले.
  • अनेक वर्षानंतर, जसे इस्राएली लोक वाळवंटातून भटकत होते, मिर्याम आणि अहरोनाने मोशेबद्दल अपशब्द वापरले, कारण त्याने कुशी लोकातील एका स्त्रीला बायको करून घेतले.
  • तिच्या मोशेविरुद्धच्या बंडखोर बोलण्यामुळे, देवाने तिला कुष्टरोगाने आजारी पडण्यास भाग पडले. पण जेंव्हा मोशेने तिच्यासाठी मध्यस्थी केली तेंव्हा देवाने तिला बरे केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहरोन, कुश, मध्यस्थी, मोशे, नाईल नदी, फारो, बंड)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4813