mr_tw/bible/names/aaron.md

3.2 KiB

अहरोन

तथ्य:

अहरोन मोशेचा मोठा भाऊ होता. देवाने अहरोनाची इस्राएल लोकांसाठी पहिला महायाजक म्हणून निवड केली होती.

  • इस्राएल लोकांना जाऊ देण्यासाठीची बोलणी फारोशी करण्यासाठी अहरोनाने मोशेला मदत केली.
  • इस्राएली लोक वाळवंटातून प्रवास करत असताना इस्राएल लोकांच्यासाठी उपासनेसाठी मूर्ती बनवून अहरोनाने पाप केले.

देवाने अहरोनाला आणि त्याच्या संततीला याजक, इस्राएल लोकांसाठी याजक म्हणूनही नेमलं होत.

(भाषांतर सूचना: नाव कसे भाषांतर करायचे

(हे सुद्धा पहा: याजक, मोशे, इस्राएल)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 09:15 देवाने मोशे व__अहरोनास अगोदरच सांगून ठेवले की__ फारो हट्टीपणा करील.
  • 10:05 फारोने मोशे व__ अहरोनास बोलावून म्हटले__ की जर ते गोमाशांची पीडा दूर करतील तर मी इस्राएली लोकास मिसर देश सोडून जाऊ देईल.
  • 13:09 मोशेचा भाऊ __अहरोन व__अहरोनाचे संतान यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले.
  • 13:11 म्हणून त्यांनी (इस्राएल लोकांनी) सोने आणून __त्याची मूर्ती बनविण्यासाठी ते__अहरोनाकडे दिले.
  • 14:07 ते (इस्राएल लोक) मोशे व अहरोनावर भडकले व म्हणाले, "तुम्ही आम्हांस अशा भयानक ठिकाणी का आणिले?"

Strong's

  • Strong's: H175, G2