mr_tw/bible/kt/intercede.md

3.5 KiB

मध्यस्थी, रदबदली करणे (मध्यस्थी करणे)

व्याख्या:

"मध्यस्थी" आणि "रदबदली करणे" या शब्दांचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीकडे विनंती करणे असा होतो. पवित्र शास्त्रात, ह्याचा संदर्भ बऱ्याचदा, इतर लोकांच्याबद्दल प्रार्थना करण्याशी येतो.

  • "च्या बद्दल मध्यस्थी करा" आणि "मध्यस्थी करा" या अभिव्यक्तींचा अर्थ इतर लोकांच्या फायद्यासाठी देवाकडे विनंती करणे असा होतो.
  • पवित्रशास्त्र असे शिकवते की, पवित्र आत्मा आपणासाठी मध्यस्थी करतो, म्हणजेच, तो आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.
  • एखादा व्यक्ती, इतर लोकांच्यासाठी एखादा व्यक्ती जो अधिकारी आहे, त्याच्याकडे विनंती करण्याद्वारे मध्यस्थी करतो.

भाषांतर सूचना:

  • "मध्यस्थी" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "च्या साठी विनंती करणे" किंवा "(एखाद्याला) एखादी गोष्ट (दुसऱ्यासाठी) करण्यासाठी आवाहन करणे" असे केले जाऊ शकते.
  • "मध्यस्थी करणे" या नामाचे भाषांतर, "कळकळीची विनंती करणे" किंवा "विनंती करणे" किंवा "तातडीची प्रार्थना" असे केले जाऊ शकते.
  • "च्या साठी मध्यस्थी करा" या वाक्यांशाचे भाषांतर, "च्या फायद्यासाठी विनंती करा" किंवा "च्या वतीने कळकळीची विनंती करा" किंवा "देवाला मदतीसाठी विचारणे" किंवा "(एखाद्याला) आशीर्वादित करण्यासाठी देवाला कळकळीची विनंती करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: प्रार्थना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6293, G1783, G1793, G5241