mr_tw/bible/kt/pray.md

6.5 KiB
Raw Permalink Blame History

प्रार्थना, प्रार्थनेची, प्रार्थना केल्या, प्रार्थना केली

व्याख्या:

"प्रार्थना" आणि "प्रार्थनेची" या शब्दांचा संदर्भ देवाशी बोलण्याशी आहे. या शब्दांचा उपयोग खोट्या देवांशी बोलण्याच्या प्रयत्नाना संदर्भित करण्यासाठी देखील केला जातो.

  • लोक शांतपणे प्रार्थना करू शकतात, त्यांच्या विचारांमध्ये ते देवाशी बोलू शकतात, किंवा ते मोठ्याने प्रार्थना करू शकतात, त्यांच्या आवाजामध्ये ते देवाशी बोलू शकतात. काहीवेळा प्रार्थना लिहून काढली जाऊ शकते, जसे की, जेंव्हा दावीदाने त्याच्या प्रार्थना स्तोत्रसंहितेच्या पुस्तकात लिहून काढल्या.
  • प्रार्थनेमध्ये देवाने दया करणे, संकटामध्ये मदत मागणे, आणि निर्णय घेण्यासाठी सुज्ञान मागणे, या गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
  • बऱ्याचदा लोक आजारी लोकांना बरे करण्यास, किंवा ज्याला त्याची मदत इतर मार्गांनी हवी आहे त्यासाठी देवाकडे मागतात.
  • जेंव्हा लोक प्रार्थना करत असतात, तेंव्हा ते देवाला स्तुती आणि धन्यवाद सुद्धा देतात.
  • प्रार्थनेमध्ये आपण केलेल्या पापांना कबूल करणे आणि ते क्षमा करण्यासाठी देवाला विनंती करण्याचा देखील समावेश होतो.
  • देवाशी बोलण्याला काहीवेळा त्याच्याशी "संवाद" साधने असे देखील म्हणतात, जसा आपला आत्मा त्याच्या आत्म्याशी संवाद साधतो, आपली भावना सामायिक करतात, आणि त्याचा उपस्थितीचा आनंद घेतात.
  • या शब्दाचे भाषांतर "देवाशी बोलणे" किंवा "देवाशी संवाद साधने" असे केले जाऊ शकते. * या शब्दाचे भाषांतर शांतपणे प्रार्थना करण्याच्या शब्दाचा समावेश करण्यास देखील सक्षम असले पाहिजे.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, माफ करणे, स्तुती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 06:05 इसहाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली, व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली व तिच्या पोटात जुळी मुले होती.
  • 13:12 परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली व देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.
  • 19:08 मग बाल देवतेचे संदेष्टये प्रार्थना करु लागले,‘‘बाल देवता, आमचे ऐका!
  • 21:07 याजक लोकांसाठी देवाला प्रार्थनाही करत असत.
  • 38:11 शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.
  • 43:13 शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर असत.
  • 49:18 देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो.

Strong's

  • Strong's: H559, H577, H1156, H2470, H3863, H3908, H4994, H6279, H6293, H6419, H6739, H7592, H7878, H7879, H7881, H8034, H8605, G154, G1162, G1189, G1783, G2065, G2171, G2172, G3870, G4335, G4336