mr_tw/bible/names/pharaoh.md

3.2 KiB

फारो, मिसरचा राजा

तथ्य:

प्राचीन काळी, ज्या राजाने मिसर देशावर राज्य केले त्याला फारो असे म्हणत.

  • सर्व मिळून, 300 पेक्षा अधिक फारोंनी 2000 पेक्षा अधिक वर्षापर्यंत राज्य केले.
  • हे मिसरी राजे खूप शक्तिशाली आणि श्रीमंत होते.
  • ह्यातील बऱ्याच फारोंचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
  • बऱ्याचदा या शीर्षकाचा उपयोग शीर्षक म्हणून करण्याऐवजी नाव म्हणून केला आहे. या प्रकरणामध्ये, हे मोठ्या अक्षरात लिहिले जाते जसे की, "फारो (Pharaoh)."

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • एके रात्री, फारो, ज्याला मिसरी लोक त्यांचा राजा म्हणत होते, त्याला दोन चिंताजनक स्वप्ने पडली.
  • योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.
  • म्हणून त्यावेळी मिसरावर राज्य करत असलेल्या फारोने इस्राएल लोकांस मिसरी लोकांचे गुलाम करून ठेवले.
  • मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे.
  • या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.

Strong's

  • Strong's: H4428, H4714, H6547, G5328