mr_tw/bible/names/jonah.md

2.5 KiB

योना

व्याख्या:

योना हा एक जुन्या करारातील इब्री संदेष्टा होता.

  • योनाचे पुस्तक, जेंव्हा देवाने योनाला निनवेच्या लोकांना संदेश देण्यासाठी पाठवले, तेंव्हा काय झाले ह्याची गोष्ट सांगते.
  • योनाने निनवेला जाण्यास नकार दिला आणि त्याऐवजी तर्शिसास जाणाऱ्या जहाजात जाऊन चढला,
  • देवाने एक मोठे वादळ आणून त्या जहाजाला पूर्णपणे व्यापून टाकले.
  • त्याने त्या जहाज चालवणाऱ्या माणसांना सांगितले की, तो देवापासून दूर पळून जात होता, आणि त्याने त्यांना त्याला समुद्रात फेकून देण्यास सुचविले. जेंव्हा त्यांनी तसे केले तेंव्हा वादळ शांत झाले.
  • योनाला एका महाकाय माश्याने गिळले, आणि तो त्या माश्याच्या पोटामध्ये तीन दिवस आणि तीन रात्री होता.
  • त्यानंतर योना निनवेला गेला आणि तिथल्या लोकांना त्याने संदेश दिला आणि ते त्यांच्या पापापासून वळले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, निनवे, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3124, G2495