mr_tw/bible/names/jezreel.md

2.1 KiB

इज्रेल, इज्रेलकर

व्याख्या:

इज्रेल हे मृत समुद्राच्या नैऋत्येला वसलेले, इस्साखारच्या कुळाच्या प्रदेशातील महत्वाचे शहर होते.

  • इज्रेल हे शहर मगिद्दो मैदानाच्या पश्चिमेकडील एका भागात होते, त्याला "इज्रेलचे खोरे" असेही म्हणतात.
  • इस्राएलच्या बऱ्याच राजांचे महल इज्रेल शहरामध्ये होते.
  • नाबोथाचा द्राक्षमळा हा अहाब राजाच्या महलाजवळ इज्रेलमध्ये होता. तेथे एलीया संदेष्ट्याने अहाबाविरुद्ध भविष्यवाणी केली.
  • अहाबाची दुष्ट पत्नी ईजबेल ही इज्रेलमध्ये मारली गेली.
  • या शहरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्यात अनेक युद्धांचा समावेश आहे.

(हे सुद्धा पहा: अहाब, एलीया, इस्साखार, ईजबेल, महल, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3157, H3158, H3159