mr_tw/bible/names/elijah.md

5.9 KiB
Raw Permalink Blame History

एलीया

तथ्य:

एलीया हा यहोवाचा सर्वात महत्त्वाचा संदेष्टा होता. इस्राएलाचे आणि यहूदाचे अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान एलीयाने भविष्यवाणी केली, ज्यामध्ये अहाब राजाचा देखील समावेश आहे.

  • देवाने एलीयाद्वारे अनके चमत्कार केले, ज्यामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा देखील समावेश आहे.
  • एलीयाने अहाब राजाला बाल नावाच्या खोट्या देवाची उपासना करण्याबद्दल दोष लावला.
  • त्याने बालच्या संदेष्ट्यांना एका परीक्षेत आव्हान दिले; त्याने हे सिद्ध झाले की यहोवा एकच खरा देव आहे.
  • एलीयाच्या जीवनाच्या शेवटी, तो अद्याप जिवंत असतानाच देवाने त्याला अद्भूतरीत्या स्वर्गात नेले.
  • शेकडो वर्षांनंतर, एलीया आणि मोशेसोबत येशू डोंगरावर दिसला आणि ते यरुशलेममध्ये येशूच्या येणाऱ्या दुःखाबद्दल आणि मृत्यूबद्दल एकत्र बोलले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: चमत्कार, संदेष्टा, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:02 जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.
  • 19:02 एलीया अहाबास म्हणला, ‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.
  • 19:03 अहाब एलीयास जिवे मारु इच्छित होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले.
  • 19:04 परंतु त्यांनी एलीयाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही.
  • 19:05 साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली.
  • 19:07 मग एलीया बाल देवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका."
  • 19:12 तेंव्हा एलीया त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका!
  • 36:03 तेंव्हा मोशे व एलीया हे संदेष्टे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार होते.

Strong's

  • Strong's: H452, G2243