mr_tw/bible/names/antioch.md

3.3 KiB

अंत्युखिया

तथ्य:

नवीन करारामध्ये अंत्युखिया नावाची दोन शहरे होती. एक भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याजवळ असलेल्या सिरियामध्ये होते. दुसरा कलस्सै शहराच्या जवळ असलेल्या रोमन प्रांतामधील पिसिदियामध्ये होता.

  • सीरियातील अंत्युखिया येथील स्थानिक मंडळी ही पहिले ठिकाण होते जिथे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना "ख्रिस्ती" म्हटले गेले. मंडळीचा सुवर्तीकांना इतर देशांपर्यंत पोहचण्यासाठी पाठवण्यामध्येही सक्रिय सहभाग होता.
  • यरुशलेमच्या मंडळीतील नेत्यांनी, ख्रिस्ती बनण्यासाठी यहुदी कायदा पाळायची गरज नाही हे त्यांना समजण्यास मदत करण्यासाठी सीरियातील अंत्युखिया येथील मंडळीतील विश्वासूंना पत्र पाठविले.
  • सुवार्ता सांगण्यासाठी पौल, बर्णबा आणि योहान मार्क पिसिदीयातील अंत्युखिया येथे गेले. दुसऱ्या शहरातून काही यहुदी अडचण निर्माण करण्यासाठी आले, आणि त्यांनी पौलाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु खूप अशा दुसऱ्या लोकांनी, यहूदी आणि विदेशी दोन्हींनी शिक्षण ऐकून येशूवर विश्वास ठेवला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बर्णबा, कलस्सै, योहान मार्क, पौल, प्रांत, रोम, सीरिया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G491