mr_tw/bible/names/barnabas.md

3.9 KiB

बर्णबा

तथ्य:

प्रेषितांच्या काळात वास्तव्य करणाऱ्या आद्य ख्रिस्ती लोकांपैकी बर्णबा एक होता.

  • बर्णबा हा कुप्र बेटावर जन्मलेला लेवी वंशातील इस्राएली होता.
  • जेंव्हा शौल (पौल) ख्रिस्ती बनला, तेव्हा बर्णबा याने इतर विश्वासू बांधवांना त्याला एक बंधू म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.
  • बर्णबा आणि पौलाने येशूविषयी सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये एकत्र प्रवास केला.
  • त्याचे नाव योसेफ होते, परंतु त्याला "बर्णबा" असे म्हटले जाते, ज्याचा अर्थ "बोधाचा मुलगा" असा होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्ती, कुप्र, शुभ वार्ता, लेवी, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • तेव्हा बर्णबा नावाच्या एका विश्वासणाऱ्याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला.
  • बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले. आय
  • एके दिवशी, अंत्युखियाचे ख्रिस्ती उपवास-प्रार्थना करत असतांना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा." तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेविले.

Strong's

  • Strong's: G921