mr_tw/bible/names/johnmark.md

2.6 KiB

मार्क म्हंटलेला योहन

तथ्य:

मार्क म्हंटलेला योहान, हा "मार्क" म्हणून सुद्धा परिचित होता, जो पौलाबरोबर त्याच्या सुवार्ताप्रसाराच्या प्रवासामध्ये सोबत असणाऱ्या मनुष्यांपैकी एक होता. तो बहुधा मार्कच्या शुभवर्तमानाचा लेखक आहे.

  • मार्क म्हंटलेला योहानाने त्याचा भाऊ बर्णबा आणि पौल यांच्याबरोबर त्यांच्या सुवार्ताप्रसाराच्या प्रवासामध्ये सोबत दिली.
  • जेंव्हा पेत्राला तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते, तेंव्हा सर्व विश्वासी एकत्र मिळून मार्क म्हंटलेल्या योहानाच्या आईच्या घरी प्रार्थना करत होते.
  • मार्क हा प्रेषित नव्हता, पण त्याला पौल आणि पेत्र या दोघांनी शिकवले होते, आणि त्याने त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्याबरोबर काम केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बर्णबा, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G2491, G3138