1.8 KiB
1.8 KiB
तेरह
तथ्य:
तेरह हा नोहाचा मुलगा शेम ह्याचा वंशज होता. तो अब्राहम, नाहोर, आणि हारान यांचा पिता होता.
- तेरह त्याचा मुलगा अब्राहम, त्याचा भाचा लोट, आणि अब्राहमाची पत्नी साराय यांना घेऊन, त्याचे ऊर येथील घर सोडून कनान देशास जाण्यास निघाला.
- कनानला प्रवास करीत असताना, तेरह आणि त्याचे कुटुंब मेसोपटेम्या (अराम नईराईम) येथील हारान शहरामध्ये बरीच वर्षे राहिला. तेरह वयाच्या 205 व्या वर्षी हारान मध्ये मरण पावला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पहा: अब्राहाम, कनान, हारान, लोट, मेसोपटेम्या, नाहोर, सारा, शेम, ऊर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- उत्पत्ति 11:31-32
- 1 इतिहास 01:24-27
- लुक 03:33-35
- Strong's: H8646, G2291