mr_tw/bible/other/teach.md

4.3 KiB

शिकवणे, शिकवते, शिकवले, शिक्षण (शिकवण), गोष्टी, न शिकवलेला

व्याख्या:

एखाद्याला "शिकवणे" म्हणजे त्याला असे काहीतरी सांगणे, जे त्याला माहित नाही. ह्याचा अर्थ सामान्यतः "माहिती प्रदान करणे" असा देखील होतो, ज्यामध्ये शिकत असलेल्या व्यक्तीचा कोणताही संदर्भ नाही. सहसा माहिती ही औपचारिक किंवा व्यवस्थित पद्धतीने दिली जाते. एखाद्या व्यक्तीची "शिकवण" किंवा "त्याचे "शिक्षण" हे त्याने जे काही शिकवले ते आहे.

  • एक "शिक्षक" हा असा कोणीतरी आहे जो शिकवतो. "शिकवणे" या कार्याचा भूतकाळ "शिकवले" असा होतो.
  • जेंव्हा येशू शिकवत होता, तेंव्हा तो देव आणि त्याच्या राज्याच्या गोष्टींचा उलगडा करत होता.
  • जो लोकांना देवाबद्दल शिकवतो अशा एखाद्याला आदरयुक्त प्रकाराने संबोधतात म्हणून येशूच्या शिष्यांनी त्याला "गुरुजी (स्वामी)" म्हणून संबोधले.
  • जी माहिती शिकवली जाते, ती दाखवली किंवा बोलली जाऊ शकते.
  • "तत्वप्रणाली (शिकवण)" या शब्दाचा संदर्भ देवाकडून स्वतःच्या शिकवणुकीशी संबंधित आहे आणि त्याचप्रमाणे जीवन कसे जगावे याविषयी देवाने दिलेल्या सूचना आहेत. याचे भाषांतर "देवाकडून शिकवण" किंवा "देव जे आपल्याला शिकवतो ते"असेही होऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर "तुम्हाला जे काही शिकवले आहे ते" या वाक्यांशाचे भाषांतर, "या लोकांनी तुम्हाला काय शिकवले आहे" किंवा "देवाने तुम्हाला काय शिकवले आहे" असे केले जाऊ शकते.
  • "शिकवणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "सांगणे" किंवा "स्पष्ट करणे" किंवा "सूचना देणे" ह्यांचा समावेश होतो.
  • सहसा या शब्दाचे भाषांतर "लोकांना देवाबद्दल शिकवणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: सूचना, शिक्षक, देवाचे वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H502, H2094, H2449, H3045, H3046, H3256, H3384, H3925, H3948, H7919, H8150, G1317, G1321, G1322, G2085, G2605, G2727, G3100, G2312, G2567, G3811, G4994