mr_tw/bible/kt/wordofgod.md

10 KiB
Raw Permalink Blame History

देवाचे वचन, देवाची वचने, यहोवाचा शब्द, परमेश्वराचे वचन, सत्याचे वचन, वचन, शास्त्र्लेख

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "देवाचे वचन" या शब्दाचा अर्थ अशा गोष्टींना सूचित करतो, ज्या देवाने लोकांना कळवल्या आहेत. यामध्ये बोललेल्या आणि लिखित संदेशांचा समावेश आहे. येशूला देखील "देवाचे वचन" असे म्हंटले जाते.

  • "शास्त्रलेख" या शब्दाचा अर्थ "लिखाण" असा होतो. हे केवळ नवीन करारात वापरले जाते आणि जुन्या करारातील हिब्रू शास्त्रवचनांना संदर्भित करते. हे लेखन म्हणजे देवाचे संदेश होते, जे त्याने लोकांना लिहायला सांगितले होते, जेणेकरून भविष्यकाळात बरेच लोक ते वाचू शकतील.
  • "यहोवाचा शब्द" आणि "परमेश्वराचे वचन" या संदर्भाचे शब्द नेहमी पवित्र शास्त्रामधील एखाद्या संदेष्ट्याला किंवा इतर व्यक्तीला देवाने दिलेला विशिष्ट संदेश दर्शवतो.
  • काहीवेळा हा शब्द फक्त "शब्द" किंवा "माझा शब्द" किंवा "तुमचा शब्द" (जेंव्हा देवाच्या शब्दांबद्दल बोलत असतो) म्हणून उद्भवतो.
  • नवीन करारात, येशूला "शब्द" आणि "देवाचे वचन" असे म्हटले जाते. या पदव्यांचा अर्थ असा आहे की देव कोण आहे हे येशू पूर्णपणे प्रकट करतो, कारण तो स्वतः देव आहे.

"सत्याचे वचन" हा शब्द "देवाच्या शब्दाला" संदर्भित करण्याचा दुसरा मार्ग आहे, ज्याचा अर्थ त्याचा संदेश किंवा शिकवण आहे. तो फक्त एकाच शब्दाचा संदर्भ देत नाही.

  • देवाच्या सत्याच्या वचनामध्ये देवाने लोकांना आपल्याबद्दल, त्याच्या निर्मितीविषयी आणि येशूद्वारे तारणाच्या योजनांबद्दल लोकांना शिकवलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो.
  • जे काही देवाने आपल्याला सांगितले आहे, ते सर्व खरं, विश्वासू, आणि वास्तविक आहे या तथ्यांवर हा शब्द भर देतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, या मुद्यांचे भाषांतर "यहोवाचा संदेश" किंवा "देवाचा संदेश" किंवा "देवाची शिकवण" या इतर मार्गांनी सुद्धा केले जाऊ शकते.
  • या संज्ञेला बहुभाषिक बनवण्यासाठी आणि "देवाची वचने" किंवा "यहोवाची वचने" असे म्हणण्यासाठी काही भाषांमध्ये हे अधिक नैसर्गिक असू शकते.
  • "परमेश्वराचे वचन प्राप्त झाले" हा शब्दप्रयोग अनेकदा देवाने त्याच्या संदेष्ट्यांना किंवा त्याच्या लोकांना काहीतरी सांगितले आहे ह्याची सुरवात करण्यासाठी वापरला जातो. याचे भाषांतर "याहोवाने हा संदेश दिला" किंवा "याहोवा हे शब्द बोलला" असेही केले जाऊ शकते.
  • "वचन" किंवा "शास्त्रलेख" या शब्दाचे भाषांतर "लिखाण" किंवा "देवाचा लिखित संदेश" म्हणून करता येईल. * या शब्दाचे भाषांतर "शब्द" या संज्ञेपासून वेगळे असावे.
  • जेव्हा "शब्द" एकटा येतो आणि तो देवाचे वचन संदर्भित करतो, तेंव्हा त्याचे भाषांतर "संदेश" किंवा "देवाचे वचन" किंवा "शिकवण" असे केले जाऊ शकते. वर सुचविलेल्या पर्यायी भाषांतरावर देखील विचार करा.
  • जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये येशूला "शब्द" म्हणून संदर्भित केले जाते, तेव्हा या शब्दाचे भाषांतर "संदेश" किंवा "सत्य" असे केले जाऊ शकते.
  • "सत्याचे वचन" या शब्दाचे भाषांतर "देवाचे सत्य संदेश" किंवा "देवाचे वचन, जे खरे आहे" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाच्या भाषांतरासाठी सत्य असण्याचा अर्थ समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे.

(हे सुद्धा पाहा: संदेष्टा, खरे, वचन, यहोवा

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 25:07 देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर!
  • 33:06 म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे.
  • 42:03 तेव्हा येशूने त्यांना, देवाच्या वचनात मसिहाविषयी काय सांगितले आहे हे स्पष्ट करुन सांगितले.
  • 42:07 येशू म्हणाला, "मी तुम्हास सांगितले होते की माझ्याविषयी देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणे अगत्याचे आहे." मग त्याने त्यांची अंतःकरणे उघडली, तेव्हा त्यांना देवाचे वचन कळले.
  • 45:10 फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
  • 48:12 परंतु येशू त्या सर्वांहून अधिक महान संदेष्टा आहे. * तो देवाचा शब्द आहे
  • 49:18 देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो.

Strong's

  • Strong's: H561, H565, H1697, H3068, G3056, G4487