mr_tw/bible/other/storehouse.md

2.9 KiB

कोठार, कोठारे

व्याख्या:

एक "कोठार" ही एक मोठी इमारत आहे, जिचा उपयोग अन्न किंवा इतर गोष्टी, सहसा बऱ्याच काळासाठी ठेवण्यासाठी केला जातो.

  • पवित्र शास्त्रात, "कोठाराचा" उपयोग सहसा जास्तीचे धान्य किंवा इतर अन्न साठवण्यासाठी केला जातो, ज्याचा उपयोग नंतर जेंव्हा दुष्काळ पडेल तेंव्हा केला जातो.
  • या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उपयोग, सर्व चांगल्या गोष्टी ज्यांना देव त्याच्या लोकांना देऊ इच्छितो त्यांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.
  • मंदिराच्या कोठारांमध्ये मौल्यवान वस्तूंचा ज्यांना यहोवाला समर्पित केलेले होते, जसे की, सोने आणि चांदी, ह्यांचा समावेश होतो. त्यातील काही वस्तूंना ज्यांचा उपयोग मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि देखरेखीसाठी केला जातो, त्यांना सुद्धा तेथे ठेवले जाते.
  • "कोठार" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "धान्य साठवण्याची इमारत" किंवा "अन्न ठेवण्याची जागा" किंवा "मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची खोली" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: संस्कार करणे, समर्पित, दुष्काळ, सोने, धान्य, चांदी, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H214, H618, H624, H4035, H4200, H4543, G596