mr_tw/bible/other/silver.md

2.7 KiB

चांदी

व्याख्या:

चांदी हे चमकणारे, करड्या रंगाचे मौल्यवान धातू आहे, ज्याचा उपयोग नाणी, दागिने, पात्रे, आणि अलंकार बनवण्यासाठी केला जातो.

  • भिन्न प्रकारची पत्रे जी बनवली जातात, त्यामध्ये चांदीचा प्याला आणि कटोरा, आणि स्वयंपाकासाठी, खाण्यासाठी किंवा वाढण्यासाठी लागणारी इतर भांडी ह्यांचा समावेश होतो.
  • सोने आणि चांदी ह्यांचा उपयोग निवासमंडप आणि मंदिर बांधण्यासाठी केला गेला. यरुशलेममधील मंदिरामध्ये चांदीपासून बनवलेली पात्रे आहेत.
  • पवित्र शास्राच्या काळात, शेकेल हे वजन करण्याचे एकक होते, आणि एखादी खरेदी करण्यासाठी बऱ्याचदा ठराविक शेकेल चांदी किंमत म्हणून द्यावी लागे. नवीन कराराच्या काळापर्यंत, भिन्न वजनाची चांदीची नाणी आली होती ज्यांना शेकेल मध्ये मोजले जात होते.
  • योसेफाच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून चांदीच्या वीस नाण्यांना (शेकेलास) विकले.
  • येशूला फसवण्यासाठी यहुदाला चांदीची तीस नाणी देण्यात आली.

(हे सुद्धा पहा: निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3701, H3702, H7192, G693, G694, G695, G696, G1406