mr_tw/bible/other/scroll.md

2.5 KiB

गुंडाळी (कागदाची, चर्मपत्राची गुंडाळी), गुंडाळ्या

व्याख्या:

प्राचीनकाळी, एक गुंडाळी ही अशा प्रकारचे पुस्तक होते, जे पपायरस किंवा कातड्याच्या लांब गुंडाळलेल्या घडीपासून बनवलेले होते.

  • गुंडाळीवर लिहिल्यानंतर किंवा वाचून झाल्यानंतर लोक त्याला गुंडाळून त्याच्या टोकाला असलेल्या धाग्याने बांधून ठेवत असत.
  • गुंडाळ्यांचा उपयोग कायदेशीर कागदपत्रे आणि वाचानांसाठी केला जात होता.
  • काहीवेळा गुंडाळ्या ज्यांना संदेशवाहक घेऊन येत असे त्यांच्यावर मेणाने शिक्का मारलेला असे. जर गुंडाळी मिळतेवेळी त्याच्यावर मेण तसेच असेल, तर प्राप्त करणाऱ्याला कळत असे की, त्या गुंडाळीला कोणीही वाचण्यासाठी किंवा त्यामध्ये काही लिहिण्यासाठी उघडलेले नाही, कारण तीच्यावर शिक्का मारलेला तसाच होता.
  • इब्री वचने लिहिलेल्या गुंडाळ्यांचा उपयोग सभास्थानात मोठ्याने वाचण्यासाठी केला जात होता.

(हे सुद्धा पहा: शिक्का, सभास्थान, देवाचे वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4039, H4040, H5612, G974, G975