mr_tw/bible/other/overseer.md

4.4 KiB

देखरेख, लक्ष ठेवणे, देखरेख करणारा, देखरेख करणारे

व्याख्या:

"देखरेख करणारा" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे, जो कामाचा आणि इतर लोकांच्या कल्याणाचा प्रभारी आहे.

  • जुन्या करारामध्ये, देखरेख करणाऱ्याचे काम, त्याच्या हाताखाली असणारे कामगार व्यवस्थित काम करतात ह्याची खात्री करण्याचे होते.
  • नवीन करारामध्ये, या शब्दाचा उपयोग आद्य ख्रिस्ती मंडळींच्या पुढाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी केला जात होता. मंडळीच्या आत्मिक गरजांची काळजी घेणे आणि विश्वासणाऱ्यांना पवित्र शास्त्राचे अचूक शिक्षण मिळत आहे ह्याची खात्री करणे हे त्यांचे काम होते.
  • पौल देखरेख करणाऱ्यांचा संदर्भ मेंढपाळ असणाऱ्या लोकांशी करतो, जे स्थानिक मंडळीतील विश्वासनाऱ्यांची, जे त्यांचे "कळप" आहेत, त्यांची काळजी घेतात.
  • देखरेख करणारा, मेंढपाळासारखा आहे, तो कळपांवर लक्ष ठेवून असतो. तो खोट्या आत्मिक शिक्षणापासून आणि इतर दुष्ट प्रभावांपासून विश्वासनाऱ्यांचे रक्षण आणि संरक्षण करतो.
  • नवीन करारामध्ये, "देखरेख करणारा," "वडील," आणि "मेंढपाळ/पाळक" हे एकाच आत्मिक पुढाऱ्याला संदर्भित करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "पर्यवेक्षक" किंवा "काळजी घेणारा" किंवा "व्यवस्थापक" यांचा समावेश असू शकतो.
  • जेंव्हा देवाच्या लोकांच्या स्थानिक समूहाच्या पुढाऱ्याचा संदर्भ देतो, तेंव्हा या शब्दाचे भाषांतर "आत्मिक पर्यवेक्षक" किंवा "असा कोणीतरी, जो विश्वासनाऱ्यांच्या समूहाच्या आत्मिक गरजांची काळजी घेतो" किंवा "असा व्यक्ती जो मंडळींच्या आत्मिक गरजांवर लक्ष ठेवतो" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: मंडळी, वडील, पाळक, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5329, H6485, H6496, H7860, H8104, G1983, G1984, G1985