mr_tw/bible/other/elder.md

2.8 KiB

वडील

व्याख्या:

वडील हे अत्मिकदृष्ट्या परिपक्व असलेले पुरुष आहेत, ज्यांच्यावर देवाच्या लोकांमध्ये अध्यात्मिक आणि व्यवहारिक नेतृत्व करण्याची जबाबदारी असते.

  • "वडील" हा शब्द या तथ्यापासून आला होता की, वडील हे मूळतः वयस्कर पुरुष होते, कारण त्यांच्या वयामुळे आणि अनुभवामुळे, त्यांना मोठे ज्ञान होते.
  • जुन्या करारामध्ये, वडिलांनी इस्राएली लोकांच्या सामाजिक न्यायामध्ये आणि मोशेच्या नियमांमध्ये नेतृत्व करण्यात मदत केली.
  • नवीन करारामध्ये, यहुदी वडिलांनी त्यांच्या समुदायामध्ये पुढारी बनण्याचे आणि लोकांच्यासाठी न्यायाधीश बनण्याचे सुरूच ठेवले.
  • आद्य ख्रिस्ती मंडळींमध्ये, ख्रिस्ती वडिलांनी, विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक मंडळींना आत्मिक नेतृत्व दिले.
  • या मंडळीतील वडिलांमध्ये, तरुण पुरुष जे आत्मिकदृष्ट्या प्रौढ होते त्यांचा देखील समावेश होता.
  • या शब्दाचे भाषांतर "वृद्ध पुरुष" किंवा "आत्मिकदृष्ट्या परिपक़्व पुरुष जे मंडळीचे नेतृत्व करतात" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1419, H2205, H7868, G1087, G3187, G4244, G4245, G4850