mr_tw/bible/other/shepherd.md

9.3 KiB

मेंढपाळ, मेंढरे राखणे, कळप सांभाळणे

व्याख्या:

मेंढपाळ हा असा माणूस आहे जो मेंढरांची काळजी घेतो. "मेंढपाळ" या क्रियापदाचा अर्थ म्हणजे मेंढ्यांचे रक्षण करणे आणि त्यांना अन्न व पाणी देणे. मेंढपाळ मेंढरांची राखण करतात, आणि त्यांना चांगले अन्न व पाणी मिळेल अशा ठिकाणी घेऊन जातात. मेंढरांना हरवण्यापासून आणि जंगली प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करण्याचे काम देखील मेंढपाळ करतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये या शब्दाचा रूपक अर्थाने उपयोग सहसा लोकांच्या आत्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. ह्यामध्ये देवाने पवित्र शास्त्रात जे काही करण्यास सांगितले आहे ते शिकवणे आणि ज्या मार्गांनी त्यांनी जीवन जगले पाहिजे त्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करण्याचा समावेश होतो.
  • जुन्या करारामध्ये, देवाला त्याच्या लोकांचा "मेंढपाळ" असे संबोधण्यात आले, कारण तो त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत होता आणि त्यांचे रक्षण करत होता. त्याने त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन सुद्धा केले. (पहा: रूपक
  • मोशे इस्राएल लोकांसाठी मेंढपाळ होता म्हणून त्याने याहोवाच्या उपासनेसाठी त्यांचे आत्मिक मार्गदर्शन केले आणि शारीरिकदृष्ट्या त्यांना कनान देशात घेऊन जाण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व केले.
  • नवीन करारामध्ये, येशूने स्वतःला "चांगला मेंढपाळ" म्हणून संबोधित केले. प्रेषित पौलाने सुद्धा त्याला मंडळीकरिता "महान मेंढपाळ" म्हणून संबोधित केले.
  • तसेच, नवीन करारामध्ये, "मेंढपाळ" या शब्दाचा उपयोग इतर विश्वासणाऱ्यांकरिता आध्यात्मिक नेत्याचा उल्लेख करण्यासाठी केला गेला. "पाळक" म्हणून भाषांतरित केलेला शब्द हा तोच शब्द आहे जो "मेंढपाळ" म्हणून भाषांतरित केलेला आहे. वडिलजन आणि देखरेख करणारे यांना सुद्धा मेंढपाळ म्हणून संबोधले आहे.

भाषांतर सूचना

जेंव्हा शब्दशः वापरले जाते, तेंव्हा "मेंढपाळ" ही कृती "मेंढरांची काळजी घेणे" किंवा "मेंढरांची देखरेख करणे" अशी भाषांतरित केली जाऊ शकते.

  • "मेंढपाळ" या व्यक्तीचे भाषांतर "एक व्यक्ती जो मेंढरांची काळजी घेतो" किंवा "मेंढ्यांची काळजी घेणारा" किंवा "मेंढ्यांचे पालन करणारा" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा रूपक अर्थाने वापरले जाते, तेंव्हा वेगवेळ्या पद्धतीनी भाषांतरित केले जाते, त्यामध्ये "आत्मिक मेंढपाळ" किंवा "आत्मिक नेता" किंवा असा एक जो मेंढपाळासारखा आहे" किंवा "मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांची काळजी घेतो तसा एक जो आपल्या लोकांची काळजी घेतो" किंवा "जसा मेंढपाळ आपल्या मेंढरांचे मार्गदर्शन करतो तसा एक जो आपल्या लोकांचे नेतृत्व करतो" किंवा "असा एक जो देवाच्या मेंढरांची काळजी घेतो" या शब्दांचा समावेश होतो.
  • काही संदर्भांत, "मेंढपाळ" हा शब्द "नेता" किंवा "मार्गदर्शक" किंवा "पालन करणारा" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "मेंढपाळ" या शब्दाचे आत्मिक रूपातील अभिव्यक्तीचे भाषांतर "ची काळजी घेणारा" किंवा "आत्म्याचे संगोपन करणारा" किंवा "मार्गदर्शन आणि शिकवणे" किंवा "चे नेतृत्व करणारा आणि काळजी घेणारा (जसा मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो)" असे केले जाऊ शकते.
  • लाक्षणिक वापर करताना, या शब्दाचे भाषांतर करताना "मेंढपाळ" या शब्दासाठी त्याच अर्थाच्या शब्दाचा उपयोग करणे किंवा समावेश करणे सर्वोत्तम राहील.

(हे सुद्धा पहा: विश्वास, कनान, मंडळी, मोशे, पाळक, मेंढी, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 09:11 मोशे आता मिसर देशापासून दूर जंगलामध्ये मेंढरे चारू लागला.
  • 17:02 दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता. आपल्या पित्याची मेंढरे चारीत असताना दाविदाने अनेकदा मेंढरांवर हल्ला करणा-या सिंह व अस्वलास जीवे मारिले होते.
  • 23:06 त्या रात्री, काही मेंढपाळ आपली मेंढरे रानामध्ये राखीत होते.
  • 23:08 मेंढपाळ लगेच येशूच्या जन्माच्या ठिकाणी पोहोचले आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यांना ते बाळ गव्हाणीमध्ये ठेवलेले दृष्टीस पडले.
  • 30:03 येशूला, हा समुदाय मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखा दिसून आला.

Strong's

  • Strong's: H6629, H7462, H7469, H7473, G750, G4165, G4166