mr_tw/bible/other/lawful.md

10 KiB

कायदेशीर (नियमशास्त्र), नियमांप्रमाणे, नियमाला धरून नसलेला, शास्त्रानुसार नसलेला, आज्ञाभंग (दुराचार), दुष्टपणा (स्वैराचारी)

व्याख्या:

"कायदेशीर" हा शब्द काहीतरी जे नियमांनुसार किंवा इतर आवश्यकतेनुसार करण्याची परवानगी असते याच्यासाठी संदर्भित केला जातो. त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द "नियमाला धरून नसलेला" हा आहे, त्याचा अर्थ "शास्त्रानुसार नसलेला" असा होतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, जे परमेश्वराच्या नैतिक नियमानुसार किंवा मोशेद्वारे आलेल्या आणि इतर यहुदी नियमानुसार करण्याची परवानगी आहे त्याला "कायदेशीर" म्हणतात. * जे काही "नियमाला धरून नाही" त्याची नियमांद्वारे "परवानगी नाही."
  • काहीतरी "कायदेशीर" करणे म्हणजे ते "योग्यरीतीने" किंवा "योग्य मार्गाने" करणे असे होय.
  • बऱ्याच अशा गोष्टी ज्या यहुदी नियमानुसार कायदेशीर किंवा बेकायदेशीर समजल्या जातात, त्या दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या देवाच्या नियमांशी सहमत नाहीत.
  • संदर्भावर आधारित, "कायदेशीर" या शब्दाला भाषांतरित करण्याच्या पद्धतींमध्ये "परवानगी असलेले" किंवा "देवाच्या नियमानुसार" किंवा आपल्या कायद्यांचे पालन करून" किंवा "योग्यरीतीने" किंवा "समर्पक" या शब्दांचा समावेश होतो.
  • "हे कायदेशीर आहे काय?" या वाक्यांशाचे भाषांतर " आपले नियम ह्याला परवानगी देतात काय?" किंवा "आपल्या नियमात आहे असे हे काहीतरी आहे काय?" असेही केले जाऊ शकते.

"नियमाला धरून नसलेल्या" आणि "नियमशास्त्रानुसार नसलेल्या" या संज्ञा नियम तोडणाऱ्या क्रियांचे वर्णन करतात.

  • नवीन करारामध्ये, "नियमाला धरून नसलेला" ही संज्ञा फक्त देवाचे नियम मोडण्याकरिताच संदर्भित केली जात नाही, तर यहुदी मनुष्यांद्वारे बनवलेले नियम मोडण्याच्या संदर्भात सुद्धा वापरली जाते.
  • कित्येक वर्षांमध्ये, देवाने यहुद्यांना दिलेल्या नियमांमध्ये त्यांनी भर घातली. जेंव्हा एखादी गोष्ट त्यांच्या मनुष्यांनी बनवलेल्या नियमात तंतोतंत बसत नसेल तर त्या गोष्टीला यहुदी नेते "नियमाला धरून नसलेली" असे म्हणतात.
  • जेंव्हा येशू आणि त्याच्या शिष्यांनी शब्बाथ दिवशी कणसे मोडून खाल्ली, तेंव्हा परुश्यानी त्यांच्यावर ते "नियमाला धरून वागले नाहीत" असे म्हणून दोष लावला, कारण शब्बाथ दिवशी काम करू नये हा यहुदी नियम मोडला गेला होता.
  • जेंव्हा पेत्र म्हणाला की अशुद्ध अन्न खाणे त्याच्यासाठी "मियामाला धरून नाही," तेंव्हा त्याचा अर्थ असा होता की, जर त्याने ते अन्न खाल्ले तर, देवाने इस्राएल लोकांना ठरविक अन्नपदार्थ खाऊ नका असा जो नियम दिला होता, तो मोडला गेला असता.

"आज्ञाभंग" हा शब्द एक मनुष्य जो आज्ञा किंवा नियम पाळत नाही त्याचे वर्णन करतो. जेंव्हा एखादा देश किंवा लोकसमुदाय "दुष्टपणाच्या" स्थितीत असतो, तेंव्हा तेथे व्यापक प्रमाणावर आज्ञाभंग, बंड, किंवा अनैतिकता असते.

  • स्वैराचारी मनुष्य हा बंडखोर आणि देवाचे नियम न मानणारा असतो.
  • प्रेषित पौल लिहितो की, शेवटच्या दिवसात "स्वैराचारी मनुष्य" किंवा "दुष्टपणाने भरलेला कोणीएक" मनुष्य असेल, ज्याला वाईट गोष्टी करण्यासाठी सैतानाने प्रभावित केलेले असेल.

भाषांतर सूचना

  • "नियमाला धरून नसलेला" ही संज्ञा "शास्त्रानुसार नसलेला" किंवा "आज्ञा मोडणारा" या शब्दांचा किंवा अभिव्यक्तीचा वापर करून भाषांतरित केली जाऊ शकते.
  • "नियमाला धरून नसलेला" याचे भाषांतर "परवानगी नसलेला" किंवा देवाच्या नियमानुसार नसलेला"किंवा "आपल्या नियमांमध्ये तंतोतंत बसत नसलेला" या मार्गांनी सुद्धा केले जाऊ शकते.
  • "नियमांच्या विरुद्ध" या अभिव्यक्तीचा अर्थ सुद्धा "नियमाला धरून नसलेला" याच्या अर्थासारखाच समान आहे.
  • "आज्ञाभंग" हा शब्द "बंडखोर" किंवा "आज्ञाभंग करणारा" किंवा "नियम-बिघडवणारा" असाही भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "स्वैराचारी" या शब्दाचे भाषांतर "कोणताही नियम न मानणारा" किंवा बंडखोर (देवाच्या नियमांच्या विरुद्ध)" असेही केले जाऊ शकते.
  • "स्वैराचारी मनुष्य" या शब्दाचे भाषांतर "असा मनुष्य जो कोणताही नियम पाळत नाही" किंवा "असा मनुष्य जो देवाच्या नियमांच्या विरोधमध्ये बंडखोरी करतो" असेही केले जाऊ शकते.
  • शक्य असल्यास, या शब्दात "नियमांची" संकल्पना पाळणे महत्वाचे आहे.
  • लक्षात घ्या की, "नियमांना धरून नसलेला" या शब्दाचा इथे वेगळा अर्थ आहे.

(हे सुद्धा पहा: कायदा, नियम, मोशे, शब्बाथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

तितास पत्र 02:14

Strong's

  • Strong's: H4941, H6530, H6662, H7386, H7990, G111, G113, G266, G458, G459, G1832, G3545