mr_tw/bible/kt/sabbath.md

5.1 KiB

शब्बाथ

व्याख्या:

"शब्बाथ" या शब्दाचा संदर्भ आठवड्याच्या शेवटच्या दिवसाशी आहे, ज्याला देवाने इस्राएली लोकांना विश्रांतीचा दिवस म्हणून वेगळे करण्यासाठी आणि कोणतेही कार्य न करण्यास सांगितले.

  • सहा दिवसात देवाने सृष्टीची रचना केल्यानंतर, त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. त्याच पद्धतीने, देवाने इस्राएली लोकांना सातवा दिवस विश्रांतीसाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी वेगळा करण्यास सांगितले.
  • मोशेच्या हातामध्ये इस्राएल लोकांसाठी दिलेल्या दगडी पाट्यांवर, देवाने लिहिलेल्या दहा अज्ञापैकी एक आज्ञा "शब्बाथ पवित्रपणे पाळ" ही आहे.
  • दिवस मोजण्याच्या यहुदी पद्धतीनुसार, शब्बाथाची सुरवात शुक्रवारी सूर्यास्ताने होत होती आणि त्याचा शेवट शनिवारी सूर्यास्ताने होत होता.
  • काहीवेळा पवित्र शास्त्रामध्ये शब्बाथाला फक्त शब्बाथ म्हणण्यापेक्षा "शब्बाथ दीवस" असे म्हंटले गेले.

भाषांतर सूचना

  • ह्याचे भाषांतर "विश्रामाचा दीवस" किंवा "आराम करण्याचा दीवस" किंवा "काम न करण्याचा दीवस" किंवा "देवाचा विश्रांतीचा दीवस" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांतरे या शब्दाला मोठ्या अक्षरात लिहून तो एक विशेष दिवस आहे जसे की, "शब्बाथ दीवस" किंवा "विश्रामाचा दीवस" असे दाखवतात.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे, हे देखील विचारात घ्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: विश्राम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 13:05 शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. अर्थात सहा दिवस तू आपले सर्व काम कर व सातवा दिवस हा तुझा विश्रांतीचा दिवस व माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ."
  • 26:02 येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या नासरेथ या ठिकाणी गेला. शब्बाथ दिवशी, तो उपासना करीत त्या ठिकाणी गेला.
  • 41:03 येशूला कबरेत ठेवल्यानंतरचा दुसरा दिवस हा शब्बाथ दिवस होता, त्या दिवशी यहूद्यांना कबरेकडे जाण्याची मनाई होती.

Strong's

  • Strong's: H4868, H7676, H7677, G4315, G4521