mr_tw/bible/other/know.md

6.4 KiB

माहित असणे (ओळखणे), माहित आहे, ओळखणे, ओळखून, ज्ञान, ओळखले जाते, कळवणे, कळून आले, अज्ञात, पूर्वज्ञान, पूर्वज्ञानानुसार

व्याख्या:

"माहित असणे" ह्याचा अर्थ काहीतरी समजून घेणे किंवा एखाद्या गोष्टीची जाणीव असणे असा होतो. "कळवणे" ही अभिव्यक्ती म्हणजे अशी अभिव्यक्ती जिचा अर्थ माहिती सांगणे असा होतो.

  • "ज्ञान" या शब्दाचा संदर्भ माहितीशी आहे, जी लोकांना माहित असते. भौतिक आणि आत्मिक या दोन्ही जगतातील गोष्टी जाणून घेण्यासाठी हे लागू करू शकतो.
  • देवा "बद्दल माहित असणे" ह्याचा अर्थ त्याच्याबद्दल तथ्य समजून घेणे कारण त्याने ते आपल्याला प्रकट केले आहे.
  • देव :माहित असणे" ह्याचा अर्थ त्याच्याबरोबर संबंध असणे असा होतो. हे लोकांना जाणून घेण्यास सुद्धा लागू होते.
  • देवाची इच्छा माहित असणे ह्याचा अर्थ, त्याने दिलेल्या अज्ञाबद्दल जागरूक असणे, किंवा एखाद्या मनुष्याबद्दल देवाची इच्छा काय आहे हे समजून घेणे असा होतो.
  • "नियम माहित असणे" ह्याचा अर्थ, त्याने दिलेल्या अज्ञाबद्दल जागरूक असणे, किंवा मोशेला दिलेल्या नियमांनुसार देवाने कोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत, हे समजून घेणे.
  • काहीवेळा "ज्ञान" हा शब्द "सुज्ञान" या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो, ज्यामध्ये देवाला प्रसन्न करणाऱ्या मार्गाने जीवन जगण्याचा समावेश आहे.
  • "देवाचे ज्ञान" ह्याचा उपयोग "यहोवाचे भय" यासाठी समानार्थी शब्द म्हणून केला जातो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "माहित असणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "समजून घेणे" किंवा "याची जाणीव असणे" किंवा "च्या बद्दल जागरूक असणे" किंवा "सह परिचित असणे" किंवा "च्या बरोबर संबंधात असणे" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये "माहित असणे" या शब्दासाठी दोन वेगवेगळे शब्द असू शकतात, गोष्टी माहित असण्यासाठी एक आणि व्यक्ती माहित असणे आणि त्याच्याबरोबर संबंध असण्यासाठी दुसरा.
  • "कळवणे" या शब्दाचे भाषांतर "लोकांना कळण्यास निमित्त होणे" किंवा "प्रकट करणे" किंवा "च्या बद्दल सांगणे" किंवा "स्पष्ट करणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • एखाद्या "च्या बद्दल माहित असणे" ह्याचे भाषांतर "जागरूक असणे" किंवा "याची जाणीव असणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • ":कसे ते माहित असणे" या वाक्यांशाचा अर्थ प्रक्रिया समजून घेणे किंवा काहीतरी करवून घेण्याची पद्धत असा होतो. ह्याचे भाषांतर "सक्षम असणे" किंवा "कौशल्य असणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर "ज्ञान" या शब्दाचे भाषांतर, "जे माहित आहे" किंवा "सुज्ञान" किंवा "समजुतदारपणा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: नियम, प्रकट करणे, समजणे, ज्ञानी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1843, H1844, H1847, H1875, H3045, H3046, H4093, H4486, H5046, H5234, H5475, H5869, G50, G56, G1097, G1107, G1108, G1231, G1492, G1921, G1922, G1987, G2467, G2589, G3877, G4267, G4894