mr_tw/bible/kt/reveal.md

4.1 KiB

प्रकट करणे, प्रकट करतो, प्रकट केले, प्रकटीकरण

व्याख्या:

"प्रकट करणे" या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट माहित होण्यास कारणीभूत होणे. "प्रकटीकरण" हे असे काहीतरी आहे जे ज्ञात केले गेले आहे.

  • देवाने जे काही निर्माण केले त्यातून आणि लोकांच्याबरोबर त्याने बोललेल्या किंवा लिहिलेल्या संदेशाच्या संवादाद्वारे, त्याने स्वतःला प्रकट केले.
  • देव स्वतःला स्वप्न किंवा दर्शनाद्वारे सुद्धा प्रकट करतो.
  • जेंव्हा पौल म्हणतो की, त्याने सुवार्ता "येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाद्वारे" ग्रहण केली, तेंव्हा त्याचा अर्थ येशूने स्वतः सुवार्ता त्याला स्पष्ट केली असा होतो.
  • नवीन करारातील पुस्तक "प्रकटीकरण" ह्यात देवाने प्रकट केलेल्या घटना आहेत, ज्या शेवटच्या काळात घडतील. त्याने त्या प्रेषित योहानाला दर्शनाद्वारे प्रकट केल्या.

भाषांतर सूचना

  • "प्रकट करणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "ज्ञात करणे" किंवा "उघड करणे" किंवा "स्पष्टपणे दाखवणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
  • संदर्भाच्या आधारावर, "प्रकटीकरण" ह्याचे भाषांतर करण्याचे "देवापासून संवाद" किंवा "देवाने प्रकट केलेल्या गोष्टी" किंवा "देवाबद्दलचे शिक्षण" हे शक्य मार्ग आहेत. "प्रकट करणे" ह्याचा भाषांतराचा अर्थ तसाच ठेवणे हे सर्वोत्तम राहील.
  • "जिथे प्रकटीकरण नाही" या वाक्यांशाचे भाषांतर "जेंव्हा देव स्वतःला लोकांना प्रकट करत नाही" किंवा "देव लोकांच्याबरोबर बोलत नाही" किंवा "अशा लोकांच्यामध्ये जिथे देव संवाद करीत नाही" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः सुवार्ता, शुभवर्तमान, स्वप्न, दर्शन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H241, H1540, H1541, G601, G602, G5537