mr_tw/bible/other/glean.md

2.6 KiB

उरले (सरवा), उरलेले

व्याख्या:

"सरवा" या शब्दाचा अर्थ म्हणजे शेतातील किंवा बागांमधून जाऊन आणि कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी मागे सोडलेले कोणतेही धान्य किंवा फळ उचलणे असा होतो.

  • देवाने इस्राएली लोकांना सांगितले की, विधवा, गरीब, लोक, आणि परराष्ट्रीय ह्यांना सरवा, राहिलेले धान्य वेचू द्यावे, जेणेकरून ते त्यांच्यासाठी अन्नाचा प्रबंध करू शकतील.
  • काहीवेळा शेताचा मालक सरवा वेचानाऱ्यांना थेट कापणी करणाऱ्यांच्या मागे मागे जाण्याची परवानगी देत असे, ज्यामुळे ते अजून अधिक सरवा गोळा करण्यास सक्षम होत असत.
  • हे कसे काम करते ह्याचे स्पष्ट उदाहरण आपण रुथच्या कथेमध्ये पाहू शकतो, जीला उदारपणे तिचा नातेवाईक बवाज ह्याच्या शेतामध्ये कापणी करणाऱ्यांच्या मध्ये जाऊन सरवा वेचायची परवानगी मिळाली.
  • "सरवा" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "उचलणे" किंवा "एकत्रित" किंवा "गोळा" ह्यांचा समावेश होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: बवाज, धान्य, पिके, रुथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3950, H3951, H5953, H5955