2.6 KiB
2.6 KiB
रुथ
तथ्य:
रुथ ही एक मवाबी स्त्री होती, जी अशा काळात राहत होती, जेंव्हा शास्ते इस्राएली लोकांचे नेतृत्व करत होते. तिने मवाबमध्ये एका इस्राएली पुरुषाशी लग्न केले, जेंव्हा शास्ते इस्राएली लोकांचे नेतृत्व करीत होते, तेंव्हा तो दुष्काळामुळे त्याच्या कुटुंबासहित तेथे राहायला गेला होता.
- रुथचा नवरा मेला, आणि काही कालांतराने तिने, तिची सासू नामी हिच्याबरोबर तिच्या मुळगावी, इस्राएल मधील बेथलेहेम येथे जाण्यासाठी मवाब सोडले.
- रुथ ही नामीशी एकनिष्ठ होती, आणि तिला अन्न पुरवण्यासाठी तिने कठोर परिश्रम केले.
- तिने स्वतःला इस्राएलाचा एक खरा देव, ह्याच्या सेवेसाठी समर्पित केले.
- रुथने बवाज नावाच्या इस्राएली मनुष्याशी लग्न केले, आणि एक मुलाला जन्म दिला, जो पुढे जाऊन दावीद राजाचा आजा बनला. कारण दावीद राजा येशूचा पूर्वज होता, म्हणून रुथ सुद्धा त्याची पूर्वज होती.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बेथलहेम, बवाज, दावीद, शास्ते)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H7327, G4503