mr_tw/bible/names/bethlehem.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

बेथलेहेम, एफफ्राथ

तथ्य:

बेथलेहेम हे इस्राएलमधील यरुश्लेम शहराच्या बाजूचे लहान शहर होते. हे "एफफ्राथ" या नावाने सुद्धा ओळखले जाते, जे कदाचित त्याचे मूळ नाव आहे.

  • बेथलेहेम या शहराला "दाविदाचे शहर" असेही म्हणतात, कारण दावीद राजाचा जन्म तेथे झाला होता.
  • मीखा संदेष्ट्याने सांगितले होते की, मनश्शे हा "बेथलेहेम एफफ्राथ" येथू येईल.
  • या भविष्यवाणीची पूर्तता अनेक वर्षांनी, येशू बेथलेहेमात जन्मल्यानंतर झाली.
  • बेथलेहेम या नावाचा अर्थ "भाकरीचे घर" किंवा "अन्नाचे घर" असा होतो.

(हे सुद्धा पहा: कालेब, दावीद, मीखा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता.
  • यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल. मीखा संदेष्टयाने सांगितले की मसिहा बेथलेहेम नगरामध्ये जन्मास येईल.
  • योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.
  • आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!

Strong's

  • Strong's: H376, H672, H1035, G965